जगातील पहिला स्मार्टफोन IBM Simon नुकताच 21 वर्षांचा झाला आहे. 16 ऑगस्ट 1994 रोजी या फोनची विक्री सुरु झाली होती. स्मार्टफोनमध्ये टचस्क्रीन, ईमेल आणि अनेक मॉडर्न फीचर्स होते.
वेब ब्राउझर नसले तरी ईमेल एक्सेस होत असल्यामुळे तत्कालीन काळात याची बात काही निराळीच होती. फोनच्या मदतीने फॅक्स देखील पाठवला जात असे. IBM आणि अमेरिकन सेल्युलर कंपनी 'बेलसाउथ'ने या फोनची निर्मिती केली होती.
अर्धा किलो वजन:
घर बांधण्यासाठी लागणार्या विटेप्रमाणे दिसणार्या Simon स्मार्टफोनची लांबी 23 सेंटीमीटर होती. तसेच या फोनचे वजन 0.123 पाउंड्स (अर्धा किलो) होते. फोनला एक LCD टचस्क्रीन होती.
किंमत 72005 रुपये:
1100 डॉलर्स (जवळपास 72005.95 रुपये) किमतीत हा फोन लॉन्च करण्यात आला होता. दोन वर्षांच्या कॉन्ट्रेक्टमध्ये हा फोन 900 डॉलर्स (जवळपास 58931.96 रुपये) मध्ये हा फोन मिळत होता. त्या काळात कंपनीने या मॉडेलचा जवळपास पन्नास हजार हँडसेट्स विकले होते. मात्र, हा फोन एका वर्षांत बंद होता.
पुढील स्लाइडवर वाचा, जगातील पहिला स्मार्टफोन IBM Simonचे डिटेल्स...