गॅजेट डेस्क - ई-कॉमर्स वेबसाइट Yerha.com ने Elari Nanophone C लाँच केला आहे. भारतात हा फोन www.yerha.com वरून मागवला जाऊ शकतो. कंपनीचा दावा आहे की हा जगातला सर्वात छोटा फोन आहे. हा फोन क्रेडिट कार्डाहूनही छोटा असल्याचे सांगण्यात येत आहे.
- हा फोन ब्लॅक, रोझ गोल्ड आणि सिल्वहर कलर व्हेरिएंटमध्ये मिळतो. याची किंमत 3,940 रुपये आहे. हा एक स्टायलिश, अल्ट्रा कॉम्पॅक्ट आणि अँटी स्मार्ट मोबाइल आहे.
असे आहेत फीचर्स
या फोनचा डिस्प्ले एक इंचाचा आहे. रिझॉल्यूशन 128X96 आहे. यात मीडियाटेक एमटी 6261डी आणि 32 एमबी रॅम आहे. स्टोरेज मायक्रो एसडी कार्डद्वारे 32 GB पर्यंत वाढवता येते. फोनला पॉवर देण्यासाठी यात 280 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, याची बॅटरी 4 तासांचा टॉकटाइम आणि 4 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते.
3MP कॅमेरा
या फोनमध्ये MP3 प्लेयर, एफएम रेडियो, व्हॉइस रेकॉर्डिंग, फोन रेकॉर्डिंग असे फंक्शन्सही देण्यात आले आहेत. जीएसएम कनेक्टिव्हिटीशिवाय यात 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीही आहे. याद्वारे अँड्राइड आणि iOS डिव्हाइसला कनेक्ट होता येईल.
पुढच्या स्लाइडमध्ये पाहा, फोनचे आणखी काही फोटोज....