आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

www झाले 24 वर्षांचे, ज्‍यांनी दिले इंटरनेटला व्‍यापक स्‍वरूप, वाचा त्‍यांच्‍या विषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधुनिक काळात इंटरनेटचे महत्‍व खुप वाढले आहे. इंटरनेट हे मानवी जीवनातील एक अंग बनले आहे. टिम बर्नर्स ली यांनी 1989 मध्‍ये पहिल्‍यांदा वर्ल्ड वाइड वेबची कल्‍पना सुचवली. वर्ल्ड वाइड वेब (www)तयार करण्‍यासाठी जवळपास दोन वर्ष लागली. ते 1991 मध्‍ये पुर्ण झाले.
टिम यांनी मार्च 1989 मध्‍ये एक रिसर्च पेपर पब्लिश केला होता. रिसर्च पेपरमध्‍ये टिम यांनी CERN कंपनीच्‍या मॅनेजरकडे एका अशा इनफर्मेशन सिस्‍टमची मागण्‍ाी केली होती. जी सीस्टिम त्‍यांच्‍या लॅबमधील एका कम्प्यूटरने दुस-या कम्प्यूटरशी जाेडले जाईल. टिम यांची मागणी मान्‍य करण्‍यात आली. त्‍यानंतर यूनिव्‍हर्सिटी आणि रिसर्चर्स यांनी एका कनेक्शन नेटवर्कच्‍या साहाय्याने इंटरनेटवर पहिला संवाद साधला.
एप्रिल 1993 मध्‍ये CERN कंपनीने इंटरनेटची रॉयल्‍टी ओपन सोर्स केली. त्‍यानंतर इंटरनेटचे युग सुरू झाले. 90 च्‍या दशकाला डॉट-कॉमचे युग असे म्‍हटले जाते. या दशकात अनेक वेब कंपन्‍यांचा जन्‍म झाला. यामध्‍ये गुगल, अॅमेझॉन सारख्‍या कंपन्यांचा समावेश अाहे.

पुढील स्‍लाइडमध्‍ये वाचा ज्‍यांनी दिले इंटरनेटमध्‍ये योगदान त्‍यांच्‍या विषयी...