आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Launches Mi 4C With Type C Port And Powerful Precessor

Type-C पोर्ट, शार्प डिस्प्ले व 13MPचा स्मार्ट कॅमेर्‍यासह लॉन्च झाला Mi 4C

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xiaomi कंपनीने आपला नवा फ्लॅगशिप डिव्हाइस लॉन्च केले आहे. कंपनीने चीनमध्ये Mi 4cचे दोन व्हेरिएंट्‍स सादर केले आहेत.

किंमत -
16 GB इंटरनल मेमरी व 2 GB रॅम असलेल्या हँडसेटची किंमत CNY 1,299 (जवळपास 13,500 रुपये) आहे. 32 GB इंटरनल मेमरी व 3 GB रॅम असलेल्या हँडसेटची ‍िकंमत CNY 1,499 (जवळपास 15,500) रुपये ठेवण्यात आली आहे. चीनमध्ये बुधवारपासून (23 सप्टेंबर) या फोनची विक्री सुरु झाली आहे. भारतीय बाजारात हा फोन लवकरच लॉन्च होणार आहे.

असे आहेत Xiaomi Mi 4c चे फीचर्स
फोनमध्ये मायक्रो USB केबल व USB टाइप C पोर्ट आहे. 4G नेटवर्कला हा फोन सपोर्ट करतो. फोनला 5 इंचाचा फुल HD सनलाइट डिस्प्ले आहे. 1080 X1920 पिक्सलचे रेझोल्युशन क्वॉलिटी देतो. 64 बिट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 808) हेक्सा कोअर प्रोसेसरने हा फोन अद्ययावत आहे.

पुढील स्लाइड्स वाचा, Xiaomi Mi 4C चे इतर फीचर्स...