आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi To Launch Mi 4c Smartphone Today In India

Xiaomi Mi 4c स्मार्टफोन आज होणार भारतात लॉंन्च: वाचा खास फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनची कंपनी Xiaomi आपला बहुचर्चित Mi 4c स्मार्टफोन आज (मंगळवार) भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. एका इव्हेंटमध्ये Mi 4c सादर करण्यात येणार आहे.कंपनीचे को-फाउंटर लिन बिन यांनी iPhone 6 च्या फ्रंट कॅमेरातून घेतलेल्या सेल्फीशी Mi 4C मधून घेतलेल्या सेल्फीसोबत कम्पेअर करून पाहिला आहे. त्यामुळे या फोनमध्ये दर्जेदार सेल्फी कॅमेरा असेल. तसेच नवा हँडसेट स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसरने अद्ययावत असल्याच्या वृत्ताला कंपनीने आधीच दुजोरा दिला आहे.

लिन यांनी चीनीची सोशल मीडिया साइट 'व्हिबो'वर केलेल्या एका पोस्टमध्ये हँडसेटच्या फ्रंट कॅमेराचे अनेक फीचर्स सांगितले आहेत. Mi 4c मध्ये 5 मेगापिक्सलजचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून सोबत सेंसरही आहे. 85 डिग्री वाइड अँगल लेंस व सेल्फ टायमरसोबत हँडसेटने फोटो क्लिक करता येतो. Mi 4C हा ड्युअल सिम सपोर्ट आहे. याशिवाय हँडसेटमध्ये दमदार बॅटरी आहे.

लॉन्च होणार दोन व्हेरिएंट्स
Xiaomi Mi 4c दोन व्हेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. एका व्हेरिएंट 2 GB रॅम व 16 GB मेमरीसोबत तर दुसरे व्हेरिएंटमध्ये 3GB रॅम व 32 GB मेमरी असणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, Xiaomi Mi 4C चे इतर फीचर्स...