आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yedub App: A Free Indian Android App To Record Dialogues

‘येडब अॅप’ने सेलिब्रिटींच्या संवादफेकीच्या शैलीत रेकॉर्ड करा आवाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महानायक अमिताभ बच्चन, दबंग सलमान खान, शाहरुख खानसारख्या प्रख्यात कलाकारांच्या आवाजाची जादू कोट्यवधी सिनेरसिकांवर आहे. मात्र, आता आपल्या आवाजातील संवादांना या ताऱ्यांच्या आवाजाचे कोंदण चढवता येईल. ‘येडब’ या मोबाइल अॅपने ही किमया घडवून आणली आहे. अॅपमध्ये आपल्या आवाजात रेकॉर्ड केलेले संवाद आपल्याला आवडत्या कलाकाराच्या संवादफेकीच्या शैलीत रेकॉर्ड करून ऐकता येतात.

या अॅपमध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, रणवीर कपूर, सनी देओल, धर्मेंद्र, अजय देवगण, परेश रावल, इरफान खान, अक्षय खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, अमरिश पुरी, कंगना राणावत, सनी लिओन, "तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दया भाभी, अंगुरी भाभीसह सुमारे ५० चित्रपट आणि टीव्हीवरील तारे-तारकांच्या आवाजात युजर आपला आवाज डब करू शकतात.

ही देखील वैशिष्ट्ये : येडब अॅपमध्ये सोशल डब शेअर, पिक्चर विथ डब बॅकग्राऊंडसारखी अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत. येडबचे सीईअो अंकुश शर्मा यांच्यानुसार, येडब आपल्या युजर्सना काही तरी नवे करण्यास वाव आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. येडबची ही सेवा फ्रेंच, चायनीज, जपानीसह अनेक परदेशी भाषांतही सादर करण्याची तयार केली जात आहे.

सोशल साइट्सवर शेअरिंग: युजर्स आपल्या आवाजातील सिताऱ्यांचे संवाद स्टोअर करून ठेवू शकतील. तसेच त्यावर सेल्फी व्हिडिओ तयार करून ते फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपसह इतर सर्व सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करू शकतील.