आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 एप्रिलआधीच असा बंद करा तुमचा Reliance Jio चा पोस्टपेड नंबर, घरी येणार नाही Bill

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- रिलायन्स जिओची फ्री सर्व्हिस 31 मार्चनंतर बंद होणार आहे. दुसरीकडे, जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 1 एप्रिलपासून जिओ प्राईम मेंबरशिप सुरु केली आहे. पण, पोस्टपेड ग्राहकांचे काय? असा प्रश्न उपस्थित करण्‍यात येत आहे.

पोस्टपेट ग्राहकांना जिओतर्फे एप्रिलनंतर प्लॅननुसार बिल पाठवण्यात येणार आहे. तुम्ही पोस्टपेड ग्राहक असाल तर एक एप्रिलच्या आधीच आपला जिओ नंबर बंद करू शकतात. तुम्ही  नंबर बंद केला नाही तर 1 तारखेपासून तुमचे मीटर सुरु होणार आहे. तुमच्या घरच्या पत्त्यावर तुम्हाला प्रत्येक महिन्याला बिल येत रा‍हील.

पोस्टपेड नंबर बंद करण्‍यासाठी काय आहे प्रोसेस...
- तुम्ही पोस्टपेड यूजर आहात आणि तुम्हाला एक एप्रिलआधीच जिओ नंबर बंद करायचा आहे तर कस्टमर केअरवर 198 वर  कॉल करून किंवा जिओच्या स्टोअरवर जाऊन आपला नंबर बंद करू शकतात.
- कस्टमर एक्झिक्युटीव्ह तुमचा नंबर बंद करण्याची रिक्वेस्ट एक्सेप्ट करून पुढील सात दिवसांत तुमचा नंबर बंद होईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, प्रीपेड यूजर्स आपला नंबर असा बंद करू शकतात...
बातम्या आणखी आहेत...