आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त 84 रुपयांमध्ये मिळतो मोबाइल, येथे रस्त्यावर मिळतात स्मार्टफोन...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांग्लादेशच्या रस्त्यांवर एक वेगळेच दृष्य पाहायला मिळते. येते काही काळासाठी बाजार भरतो, ज्यामध्ये फुटपाथवर स्मार्टफोन विकले जातात. हे फुटपाथ मार्केट जवळपास अर्धा किलोमीटर पसरलेले असते. हा गरीब देश असूनही येते बेसिक फोन 100 टका म्हणजेच भारताच्या 84 रुपयांमध्ये मिळतात. फोनच्या क्वालिटीसोबत किंमत वाढते. हे मार्केट बांग्लादेशाची राजधानी ढाकाच्या साउथ सिटी कॉरपोरेशनमध्ये भरते. या मार्केटमध्ये फोनसोबतच बॅटरी, चार्जर, हेडफोन्स आणि कव्हरसारख्या एसेसरीज मिळतात, जे जास्तीत जास्त मेड इन चायना असतात. सॅमसंगपासून आयफोनपर्यंत सर्व ब्रांडेड फोन येते मिळतात...

या बाजारात नोकिया, सॅमसंग, HTC, सोनी, मायक्रोमॅक्स, सिम्फॉनी कंपनीचे फोन मिळतील. यासोबतच iPhone च्या डुप्लीकेट मिळतील. या बाजारात विक्री होणारे मोबाईल चोरीचे किंवा लोकांचे हरवलेले असतात. या मार्केटमध्ये iPhone 6774 रुपये आणि hTC 6351 रुपयांमध्ये मिळते. या मार्केटमध्ये जुने मोबाईल विकले जातात. फोनचे व्यापारी यूनस सांगतात की, आम्ही जास्तीत जास्त जुने फोन बेगम बाजारातून ठोकमध्ये खरेदी करतो. जेथे सर्व प्रकारचा इलेक्ट्रॉनिक्स गुड्स आणि जंक उपलब्ध असतो. ज्या मॉडलमध्ये सुधारणा होतील, असेच मॉडेल आम्ही निवडतो. अनेक वेळा आम्ही फोनचे बिघडलेले पार्ट्स दुस-या फोनच्या पार्टने रिप्लेस करुन विकतो. आम्ही फोनची बॉडी चेंज करतो असे करण्यासाठी खास ट्रेनिंग घ्यावी लागत नाही.
एकदा विकल्यावर परत करता येत नाही
आम्ही फोन विकण्याअगोदर कस्टमर्सला तपासून पाहण्याची पुर्ण संधी देतो, परंतु एकदा फोन विकल्यावर परत घेत नाही. फोनवर कोणत्याच प्रकारची गॅरंटी दिली जात नाही. येथील फोन्ससोबतच VCD प्लेयर्स, कॅसेट प्लेयर्स, कॅमरा, रेडियो, स्मॉल टिव्ही सेट, कम्प्यूटर पार्ट्स, आयरन, टेबल फँस, रिचार्जेबल इमरजंसी लाइट्स, टॉर्च, स्टीरियो स्पीकर, वूफर, हेयरड्रायरसुध्दा सहज मिळते. या मार्केटवर 200 लोकांचा उदरनिर्वाह होतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा या मार्केटचे फोटोज...