आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार, ईपीएफओच्या UAN डेटात तफावत; 1 लाख सदस्यांचे PF क्लेम अडकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएफ अडकलेले एक लाख कर्मचारी रोजगार प्रोत्साहन योजना (PMRPY) आणि प्रधानमंत्री परि‍धान रोजगार प्रोत्‍साहन योजनेशी (PMPRY) निगडीत आहेत. - Divya Marathi
पीएफ अडकलेले एक लाख कर्मचारी रोजगार प्रोत्साहन योजना (PMRPY) आणि प्रधानमंत्री परि‍धान रोजगार प्रोत्‍साहन योजनेशी (PMPRY) निगडीत आहेत.
नवी दिल्ली- आधार आणि ईपीएफओच्या युनिवर्सल अकाउंट नंबर (UAN) च्या डेटामध्ये तफावत तसल्याने एक लाखाहून अधिक जणांचा PF क्लेम अडकला आहे. हे सर्व जण रोजगार प्रोत्साहन योजना (PMRPY) आणि प्रधानमंत्री परि‍धान रोजगार प्रोत्‍साहन योजनेशी (PMPRY) निगडीत आहेत.

ईपीएफओ करत आहे व्हेरि‍फि‍केशन
सरकारने ऑगस्ट 2016 मध्ये संघटित क्षेत्रातील नोकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतुने याची सुरुवात केली होती. योजनेतंर्गत ईपीएफ अकाउंट असणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांना सरकारकडुन सुरुवातीच्या तीन वर्षात 8.33 दराने कॉन्‍ट्रि‍ब्‍यूशन मिळते. योजनेत सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेरिफिकेशनचे काम ईपीएफओ करत आहे. यात सामील लोकांना आपला यूएएन क्रमांक आधारशी लिंक करावा लागतो.

हा प्रश्न 30 जूनपर्यंत सोडविण्याचे आश्वासन
ईपीएफओने आपल्या सर्व फील्ड अधिकाऱ्यांना हा प्रश्न 30 जूनपर्यंत सोडविण्यास सांगितले आहे. यासंदर्भात 8 जूनला एक पत्रही लिहिण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, 8 जूनपर्यंत असलेल्या माहितीनुसार 105591 ईपीएफ सदस्य डाटा मेळ खात नसल्याने लाभापासून वंचित आहेत. 
बातम्या आणखी आहेत...