आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांतरबँक एटीएम व्यवहार शुल्कात १० टक्के कपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नॅशनल पेमेंट्स काॅर्पाेरेशन अाॅफ इंडियाने अापल्या बँकांतर्गत एटीएम यंत्रणेत हाेणा-या व्यवहारांचे शुल्क १० टक्क्यांनी (पाच पैसे) कमी केल्याचे जाहीर केले अाहे. रिझर्व्ह बँकेने प्रवर्तित केलेल्या नॅशनल फायनान्शियल स्विच या इंटरबँक नेटवर्कवर माेठ्या प्रमाणावर व्यवहार हाेतात. त्यामुळे या व्यवहारांचे प्रमाण वाढावे तसेच त्यात अधिक सक्षमता यावी यासाठी व्यवहार शुल्क कमी करून ४५ पैशांवर अाणण्यात अाले असल्याचे काॅर्पाेरेशनने म्हटले अाहे.

अामच्या सर्व बँकांसाठी मध्यवर्ती रक्कम सुविधा म्हणून काम करीत असल्याने हे व्यवहार शुल्क कमी करण्यात येत असल्याचे काॅर्पाेरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अाणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. पी. हाेटा यांनी सांगितले. नॅशनल फायनान्शियल स्विचच्या ४०० सदस्य बँका असून त्या माध्यमातून १.९२ लाख एटीएम जाेडले गेले अाहेत. ही शुल्क कपात एक मेपासून अमलात अाणण्यात अाली अाहे.

ग्राहकांवर एटीएम शुल्क अाकारण्यात अाल्यावरून वाद निर्माण झाला हाेता. त्या वेळी रिझर्व्ह बँकेला मध्यस्थी करून या प्रकरणाचा निपटारा करावा लागला. अाता ग्राहकांना दुस-या बँकांच्या एटीएममध्ये एका महिन्यात पाच वेळा माेफत व्यवहार करता येऊ
शकतील. त्यानंतर मात्र उपयाेगिता शुल्क भरावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...