आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीनंतर 5800 कंपन्यांचे संशयास्पद व्यवहार उघड; 4573 कोटी झाले जमा, 4552 कोटी काढले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ब्लॅकमनी आणि बनावट कंपन्यांच्याविरोधात मोदी सरकारने सुरु केल्या कारवाईत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नोटबंदीनंतर संशयास्पद व्यवहारांबद्दल 13 बँकांनी सरकारला माहिती दिली आहे. त्यात 5800 कंपन्यांनी संशयास्पद व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. नोटबंदीनंतर संशयास्पद व्यवहारांची बँकांनी दिलेली ही पहिली माहिती आहे. 
 
एका कंपनीत 2134 अकाऊंट 
- कॉर्पोरेट मंत्रालयाच्या माहितीनुसार, बँकांनी जारी केलेल्या 5800 कंपन्यांचे 13140 खाते सापडले आहे. कित्येक कंपन्यांच्या नावे 100 पेक्षा जास्त खाते उघड झाले आहे. यातील एका कंपनीकडे 2134 खाते सापडले. त्यानंतर काही कंपन्यांकडे 900 ते 300 दरम्यान खाती आहेत. 
ही पहिलीच माहिती 
- कॉर्पोरेट मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, 13 बँकांनी सरकारला संशयास्पद खात्यांची माहिती दिली आहे. 
- नोटबंदीच्या आधी आणि नोटबंदी नंतर या खात्यात झालेल्या व्यवहारांच्या आधारावर बँकानी ही माहिती सरकारला दिली. 
- त्यात म्हटल्यानुसार, या संशयास्पद कंपन्यांच्या खात्यात नोटबंदी आधी अर्थात 8 नोव्हेंबर 2016 पूर्वी फक्त 22.5 कोटी रुपये खात्यात शिल्लक होते. मात्र नोटबंदीनंतर 9 नोव्हेंबर 2016 पासून या कंपन्यांवर बंदी लागू होईपर्यंत या खात्यांमध्ये 4,573.87 कोटी रुपये जमा झाले आणि 4,552 कोटी रुपये काढण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...