आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीत समोर आली कंपन्यांची हेराफेरी, 58 हजार खात्यांमध्ये असे जमा झाले 17 हजार कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटबंदी लागू करण्यात आली तेव्हा काही कंपन्यांनी पैशांची हेराफेरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार नोटबंदी लागू झाल्यानंतर सुमारे 35,000 कंपन्यांच्या 58,000 संशयास्पद खात्यांमध्ये 17,000 कोटी रुपये रोख जमा करण्यात आले. नोटबंदी मागे घेण्यात आल्यावर ही कॅश बाहेर काढण्यात आली. कॉर्पोरेट प्रकरणांच्या मंत्रालयाने सांगितले, की नोटबंदीच्या वेळी मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर 2.24 लाख कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्याच्याशी निगडित 3.09 लाख डायरेक्टर डिस्कॉलिफाय करण्यात आले.
 
56 बॅंकांकडून मिळाली माहिती
आरबीआय़ला ५६ बॅंकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर या कंपन्यांच्या विरुद्ध अॅक्शन घेण्यात आली. हेराफेरीच्या या कामात 35,000 कंपन्यांच्या 58,000 अकाऊंट सामिल होते. या खात्यांमध्ये नोटबंदीनंतर 17,000 कोटी रुपये रोख जमा करण्यात आले. कलांतराने हे पैसे काढण्यात आले. या सर्व कपन्यांचे रजिस्ट्रेशन सध्या रद्द करण्यात आले आहे. काही खात्यांमध्ये नोटबंदीपूर्वी मिनिमम बॅंलेसही नव्हते. पण सरकारने घोषणा केल्यावर त्यात तब्बल 2,484 कोटी रुपये जमा करण्यात आले.
 
पुढील स्लाईडवर वाचा... अशी झाली डायरेक्टर्सवर कारवाई... एकाच कंपनीकडे २ हजार पेक्षा जास्त खाते...
बातम्या आणखी आहेत...