आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षांनंतर अॅपलने गमावला सर्वात किमती ब्रँडचा मुकुट, वर्षभरात ब्रँड मूल्यात 27 टक्क्यांची घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गेल्या वर्षभरात जगातील ५० मोठ्या कंपन्यांचे ब्रँड मूल्य १४ टक्क्यांनी वाढले आहे. २०१६ मध्ये यांचे मूल्य ११९.२६ लाख कोटी रुपये होते. या वर्षी हा आकडा १३६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ब्रँडचे मूल्य ठरवणारी कंपनी “ब्रँड फायनान्स’ने नुकतीच २०१७ मधील मोठा ब्रँड असलेल्या ५०० कंपन्यांची यादी जारी केली आहे.
 
या यादीत भारतातील केवळ ९ ब्रँडचा समावेश आहे. भारतातील सर्वाधिक मूल्याचा असलेला टाटा ब्रँड या यादीत १०३ व्या क्रमांकावर आहे. या ब्रँडच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. टॉप - ५०० मधील २४४ कंपन्या अमेरिकेतील आहेत, तर टॉप - ५  कंपन्यादेखील अमेरिकनच आहेत. टॉप-५० ब्रँडमधील ८ तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत.  

बाजार मूल्याच्या दृष्टीने विचार केल्यास जगातील सर्वात मोठी कंपनी अॅपलचे ब्रँड मूल्य २०११ ते २०१६ दरम्यान सर्वाधिक होते. मात्र, गेल्या वर्षी या ब्रँडचा विकास मंदावल्यामुळे याच्या ब्रँड मूल्यात २६.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. २०१६ मध्ये अॅपलची विक्री सुमारे ८ टक्क्यांच्या घसरणीसह १४.४४ लाख कोटी रुपयांची झाली होती. तर नफा १४.२८ टक्क्यांनी कमी होऊन ३.०६ लाख कोटी रुपयांवर आला होता. दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या गुगलच्या ब्रँड मूल्यात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
 
टॉप ५ मध्ये अॅपल, मायक्रोसॉफ्ट
कंपनी    क्रम    मागीलक्रम   ब्रँड मूल्य    फरक  
                          
गुगल    १    २    ७.३३    २३.१५%    
अॅपल    २    १    ७.१८    - २६.५७%    
अॅमेझॉन     ३    ३    ७.१३    ५२.७६%    
एटीअँडटी    ४    ६    ५.८३    ४२.२५%    
मायक्रोसॉफ्ट    ५    ४    ५.११    - १३.३९%    
(ब्रँड मूल्य लाख कोटी रुपयांत)
 
क्षेत्रानुसार सर्वात मोठे ब्रँड 
} किरकोळ विक्री :अमेरिकेची वॉलमार्ट, क्रम ८ वर कायम, ब्रँड मूल्य ४.१७ लाख कोटी रु.  
} बँकिंग :  चीनमधील आयसीबीसी, क्रम १३ वरून वाढून १०, ब्रँड मूल्य ३.२ लाख कोटी रु.  
} वाहन : जपानची टोयोटा, क्रम ११ वरून कमी होऊन १२, ब्रँड मूल्य ३.१ लाख कोटी रु.  
} आयटी : अमेरिकेतील आयबीएम, क्रम २१ वरून वाढून २०, ब्रँड मूल्य २.४२ लाख कोटी रु.  
} खाद्यान्न : स्वित्झर्लंडचा नेस्ले, क्रम ३८ वरून कमी होऊन ६१, ब्रँड मूल्य १.३ लाख कोटी रु.
बातम्या आणखी आहेत...