आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटी आणि लॉजिस्टिक्समध्ये दरवर्षी 3 लाख नाेकऱ्या देणार ई-रिटेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही वर्षात कॅशलेस व्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी सरकारद्वारे काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलली गेली आहेत. इंटरनेटपर्यंत लोकांची वाढती उपयोगिता आणि कॅशलेस व्यवस्थेकडे वाढत्या अर्थव्यवस्थेने देशातील मोठ्या आणि मध्यम शहरे आणि लहान वाड्या वस्त्या गावांमध्ये याचा लवकरच प्रभाव दिसेल. यामुळे ई-रिटेल सेक्टरमध्ये येणाऱ्या काळात वाढ पाहायला मिळेल. अशातच जारी केल्या गेलेल्या अहवालानुसार २०२० पर्यंत भारताचे ई-कॉमर्स जवळपास १०३ अब्ज डॉलरचा असेल.

अहवालानुसार या वाढीच्या कारणामुळे येणाऱ्या ५ वर्षात ई-रिटेल आणि याच्याशी जोडलेल्या क्षेत्रात जवळपास १४ लाख नव्या नाेकऱ्यांच्या संधी तयार होतील. यातील अधिक जवळपास ५५ टक्के नाेकऱ्या लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊसिंगच्या क्षेत्रात असतील. अहवालात हेदेखील दाखविले गेले आहे की, यात जवळपास ४ लाख नाेकऱ्यांत उच्च क्षमता कौशल्यांची मागणी असेल. अहवालानुसार ई-रिटेल आणि ई-कॉमर्सच्या वाढण्यामुळे आयटी आणि आयटीईएसच्या क्षेत्रातही व्यावसायिकांची मागणी वाढेल.

ई-रिटेलमधील विकासाच्या शक्यतांमुळे लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि आयटी,आयटीईएसच्या क्षेत्रात नाेकऱ्यांच्या अधिक संधी आहेत. लॉजिस्टिक मॅनेजरचे काम कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यासारख्या खरेदी अधिकारी, वाहतूक आणि गोदामाचे व्यवस्थापकाशी समन्वय करावे लागेल. आणि सामानाचा पुरवठा मॅनेज करणे हे असते. याच ई-रिटेलच्या क्षेत्रात आयटी आणि आयटीईएस व्यावसायिकांसाठीही उत्तम शक्यता आहेत. आयटी व्यावसायिकांना ई-रिटेल क्षेत्रात अॅप्लिकेशन मॅनेजर, लीड सॉफ्टवेअर मॉड्यूलर, सीनिअर वेब मॉड्यूलर आणि डेटा डेव्हलपरसारखी महत्त्वाची कामे करावयाची असतात.

मॅनेजमेंट आणि विज्ञान दोन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी संधी
लॉजिस्टिक्स व सप्लाई चेन मॅनेजमेंटचा प्रमाणपत्र, पदविका, पीजी डिप्लोमा आणि पीजी पदवी कोर्स वेगवेगळ्या संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. ५० टक्के गुणांसह १२ वी करणाऱ्या कोणत्याही शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. याशिवाय कोणत्याही शाखेमधून पदवी करणारे विद्यार्थी यातील पीजी कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. विद्यार्थी एमबीए या सप्लाई चेन मॅनेजमेंटच्या एमएससी कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात. तेच आयटीशी संबंधित कोर्स बॅचलर स्तरावर असतात. संगणक विज्ञान वा याच्याशी संबंधित शाखेतून बॅचलर डिग्री कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात.

ऑनलाइन शॉपिंग वेेबसाइटवर नाेकऱ्यांमधील अधिक संधी
या क्षेत्रात विद्यार्थी प्रवास वा तिकीट बुकिंग वेबसाइट, ऑनलाइन आणि रिटेल वेबसाइट, ऑनलाइन एज्युकेशन वेबसाइट, क्लासिफाइड पोर्टलमध्ये जॉब करू शकता. याशिवाय सप्लाय चेन मॅनेजमेंट व्यवसाय आपले सामान ऑनलाइन वेबसाइट च्या माध्यमातून विकणारे मोठे रिटेलर्स च्या येथेही जॉब करू शकता.

अनुभवानंतर उत्तम होऊ शकते पॅकेज
अनुभव आणी पदानुसार सॅलरी पॅकेज वेगवेगळी असू शकतात. लॉजिस्टिक्स या सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या क्षेत्रात करिअर सुरू करणाऱ्या व्यावसायिकांना १० ते १५ हजार रुपये प्रतिमाह पॅकेज मिळू शकते. काही वर्षांच्या अनुभवानंतर सॅलरी पॅकेज २५ ते ३० हजार रुपये प्रतिमाह एवढेदेखील होऊ शकते. आयटी व्यावसायिकांना प्रारंभी १२ ते १७ हजार रुपयांचे सॅलरी पॅकेज मिळू शकते. काही वर्षाच्या अनुभवानंतर पॅकेज ३५ ते ४० हजार रुपये प्रतिमाह असे होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...