जगप्रसिद्ध कंपनी Appleचा लेटेस्ट iphone येत्या 9 सप्टेंबरला लॉंन्च होणार आहे. इव्हेंटमध्ये iphone 6S आणि 6S plus लॉन्च होण्याची शक्यता आहे. मात्र, iphone च्या मॉडेलवरून साशंकता व्यक्त होत आहे. आधीच्या iphone च्या तुलनेत 6S आणि 6S plus जास्त पॉवरफुल असतील. iphone विषयी युजर्समध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यूजर्सच्या अपेक्षांना दोन्ही स्मार्टफोन खरे उतरतील असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
स्मार्टफोनमध्ये अग्रणी असलेली जगप्रसिद्ध कंपनी अॅपलची सुरूवात 1976 मध्ये झाली. त्या वेळी कोणाच्याही मनात विचार देखील आला नसेल की, भविष्यात Apple जगात नंबर एकची कंपनी असेल. तर जाणून घ्या त्या प्रॉडक्टविषयी ज्यामुळे Apple ने यशाचे शिखर गाठले आहेत.
Apple ची सुरूवात
Appleची सुरूवात 1976 मध्ये एका कॉम्प्युटर कंपनीच्या रुपात झाली. त्यानंतर स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॉजनियाक यांनी Apple च्या प्रॉडक्टला पॉवरफुल फीचर्सने परिपूर्ण करून जगभरातील युजर्समध्ये कंपनीला लोकप्रिय बनवण्यासाठी प्रयत्न केले.
पहिला आयफोन आणि आयपॅड
युजर्स Apple चे आयफोन आणि आयपॅडची सर्वाधिक मागणी करतात. कंपनीने 29 जून 2007 मध्ये पहिला आयफोन लॉन्च केला तर पहिला आयपॅड 3 एप्रिल 2010 मध्ये चॉन्च केला. या दोन प्रॉडक्टच्या बळावर कंपनी युजर्समध्ये सर्वात महागडी ब्रँडेड कंपनी झाली.
पुढील स्लाइडवर पाहा Apple च्या प्रॉडक्टविषयी माहिती...