मुंबई - पेट बाटल्यांसह विविध उत्पादनांच्या प्लास्टिक पॅकेजिंगवर बंदी अाणण्याचा राष्ट्रीय हरित लवाद विचार करत अाहे, परंतु त्याची अंमलबजावणी झाल्यास या क्षेत्रातील १३ लाख नोक-यांबरोबरच ५३ हजार काेटी रुपयांच्या विक्रीला माेठ्या प्रमाणावर फटका बसण्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात अाला अाहे.
बहुराष्ट्रीय उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. या पॅकेजिंग क्षेत्रात जवळपास १० हजार कंपन्या असून जवळपास १३ लाख कामगार कार्यरत अाहे. या बंदीमुळे या कामगारांना पर्यायी नोक-यांचा शोध घ्यावा लागेल, असे ‘फिक्की’ या संस्थेने केलेल्या एका अभ्यासामध्ये म्हटले अाहे. या बंदीचा प्लास्टिक उद्याेगातील ५३ हजार कोटी रुपयांच्या विक्रीवर थेट परिणाम होऊन १३ लाख कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड काेसळ्याची भीती अाहे. कारण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या दहा हजार कंपन्या प्रामुख्याने लघु अाणि मध्यम उद्योगातील असल्याचे अभ्यासात म्हटले अाहे. बंदीनंतर उत्पादन खर्च अाणि वितरणात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन त्याचा परिणाम हा प्रामुख्याने कमी किंमत असलेल्या उत्पादनांवर होऊ शकतो. प्लास्टिक पॅकेजिंगवर बंदी घालण्याऐवजी प्लास्टिकच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन कसे करता येऊ शकेल, याच्या उपाययोजना शोधून काढण्याची गरज असल्याचे या अभ्यासात म्हटले अाहे.
९० टक्के पॅकेजिंगसाठी प्लास्टिकचा वापर :
*पॅकेजिंगसाठी प्लास्टिकचा वापर करण्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्राबल्य जास्त असून बिस्किटे, काेरडे प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, केसांची निगा राखणारी उत्पादने, डेअरी तसेच लाँड्री अादी विविध उत्पादनांच्या वेष्टणासाठी ९० टक्के प्लास्टिकचा वापर हाेताे, असेही या अभ्यासात म्हटले अाहे.
*पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने प्लास्टिक पॅकेजिंगवर िनर्बंध किंवा बंदी अाणल्यास त्याचा बहुराष्ट्रीय कंपन्या, अन्न प्रक्रिया, प्लास्टिक पॅकेजिंग अाणि संबंिधत उद्याेगांवरही माेठा परिणाम हाेऊ शकताे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या दृष्टीने खर्च, अाराेग्य अाणि सुरक्षा यावरही विपरीत परिणाम हाेण्याची भीती या अभ्यासात व्यक्त करण्यात अाली अाहे.
*काच, कागद, धातू हे वेष्टणांचे पर्याय असले, तरी जागतिक पातळीवर प्लास्टिकलाच पॅकेजिंगसाठी अधिक प्राधान्य देण्यात येते.