आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५६ हजार टन डाळींची आयात करण्याचा करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय बाजारात डाळींचे वाढत असलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात डाळींचा साठा करण्यात येत आहे. तसेच इतर देशांमधूनदेखील डाळी आयात केल्या जात आहेत. सरकारने त्याअंतर्गत नुकताच ५६,००० टन डाळी आयात करण्यासंबंधीचा करार केला आहे.

देशात डाळीच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या वतीने भारतीय बाजारातूनदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. साठेबाजी रोखण्यासाठीदेखील सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत. सरकारने अतिरिक्त साठा वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे सरकारकडे लाखो टन डाळींचा साठा जमा झाला आहे. आतापर्यंत सरकारी संस्थांच्या माध्यमातून १,१९,५७२ टन डाळींची खरेदी करण्यात आली आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया, मोझांबिक, कॅनडा आदी देशांमधून डाळी आयात करण्यात आल्या आहेत. याच अंतर्गत इतर देशांमधून अाता ५६ हजार टन डाळी आयात करण्यात येत आहेत. या डाळींमध्ये २० हजार टन तूर डाळ, तर १० हजार टन उडीद डाळीचा समावेश आहे.

खरिपात उत्पादन वाढण्याची आशा
देशात उत्पादित होणाऱ्या एकूण कडधान्याचा विचार केला असता देशात दरवर्षी सुमारे सात लाख टन डाळींचा तुटवडा भासतो. मात्र, चालू खरीप हंगामात देशभरात कडधान्याची पेरणी वाढली असल्याचा अंदाज सरकारच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा कडधान्याचे उत्पादन २० लाख टन होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...