आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटोमॅक पेनचे मालक विक्रम कोठारींवर 800 कोटी घोटाळ्याचा आरोप, बँकेच्या तक्रारीनंतर CBI चे छापे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विक्रम कोठारी यांनी म्हटले आहे की मी कुठेही पळून गेलो नाही. - Divya Marathi
विक्रम कोठारी यांनी म्हटले आहे की मी कुठेही पळून गेलो नाही.

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेचा 11,400 कोटींचा घोटाळा ताजा असताना रोटोमॅक पेन तयार करणाऱ्या कंपनीचा 800 कोटींचा घोटाळा समोर आला आहे. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर सीबीआयने रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कानपूरमध्ये तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली. घोटाळ्याच्या आरोपानंतर विक्रम कोठारी देशसोडून फरार झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र कोठारी रविवारी रात्री एका लग्न सोहळ्यात दिसला होता. यावेळी तिथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह दिग्गज राजकीय नेते आणि उद्योगपती उपस्थित होते. सोमवारी कोठारीला अटक झाल्याची बातमी होती, मात्र अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही. सीबीआय अधिकारी कोठारीची पत्नी आणि मुलाकडे चौकशी करत आहे. 

 

मी पळून गेलो नाही... 
- कोठारींनी रविवारी पळून जाण्याच्या वृत्ताचे खंडन केले. त्यांनी सांगितले की मी कुठेही पळून गेलेलो नाही. मी कानपूरचा रहिवासी आहे आणि शहरातच राहातो. कामा निमित्त विदेशात जाण्याची शक्यता आहे. बँकेने माझ्या कंपनीला एनपीए घोषित केले आहे. मात्र मी डिफॉल्टर नाही. प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये आहे. मी कर्ज घेतलेले आहे ते लवकरच परत करणार आहे, असे सांगताना कोठारींनी भारतापेक्षा चांगला कोणताच देश नाही असेही म्हटले आहे. 

 

विलफूल डिफॉल्टर घोषित 
- विक्रम कोठारी हे उत्तर प्रदेशातील कानपूरमधील उद्योगपती आहेत. त्यांनी पाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे. 
- अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओवरसीज बँक आणि यूनियन बँक ऑफ इंडिया यांनी नियमांना धाब्यावर बसवून कोठारींना कर्ज दिले आहे. 
- कोठारींनी यूनियन बँक ऑफ इंडियाकडून 485 कोटी रुपये कर्ज घतले आणि अलाहाबाद बँकेकडून 352 कोटी रुपये कर्ज घेतले होते. 
- गेल्या वर्षी बँक ऑफ बडोदाने रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडला विलफूल डिफॉल्टर घोषित केले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...