आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता भरघोस रिटर्न्सचे अमिष देऊन कंपनी तुम्हाला लुटू शकणार नाही, येणार असा कायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शारदा चिट फंड, ईमू फार्मिंगपासून क्रिप्टोकरन्सीपर्यंत अनेक पॉन्झी स्कीममध्ये आपली कमाई गमावणाऱ्यांचा सरकारने विचार केला आहे. सरकार तयारी करत आहे की विना परवानगी आणि नियंत्रणाशिवाय सुरु असलेल्या स्कीम्स विरोधात कडक कायदा आणला जाईल. अशा पद्धतीने सरकार अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्सवर लगाम कसण्याची तयारी करत आहे. त्यासोबतच शक्यता आहे की सरकार या नियंत्रणाच्या माध्यमातून महसूल निर्मितीचा स्त्रोत निर्माण करत आहे. मंगळवारी केंद्रीय कॅबिनेटने बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स, 2018 मसुद्दयास मंजूरी दिली आहे. आता हा मसुदा संसदेसमोर ठेवला जाईल आणि त्याला कायद्याचे स्वरुप देण्यात येईल. 

 

सरकार का आणत आहे कायदा 
- सध्या सहारा, शारदा ग्रुप यासारख्या कंपन्यांच्या घोटाळ्यामध्ये देशभरातले लोक फसले आहेत. त्यांची लाखो, कोटींची गुतवणूक त्यात अडकली आहे. दुसरीकडे देशात क्रिप्टोकरन्सीचे चलन वाढू लागले आहे. आरबीआयच्या रिपोर्टनुसार, 2500 लोक या ट्रेडिंगमध्ये लागलेले आहेत. या दोन्ही प्रकारच्या अॅक्टिव्हिटीवर सरकारच्या वतीने कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे बुडण्याची भीती असते. सरकार आता अशा प्रत्येक अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवण्यासाठी लवकरच कायदा आणणार आहे. 
- या कायद्याचा उद्देश सर्वसामान्यांची गुंतवणूक सुरक्षित ठेवणे हा आहे. हा कायदा झाल्यानंतर गुंतवणुकदार बँकेशिवाय इतर फायनेंशियल उत्पादनांमध्ये आपले पैसे सुरक्षित पद्धतीने गुंतवू शकतील.

 

काय आहे पॉन्झी स्कीम्स 

पॉन्झी स्कीमद्वारे फसवणूक ही जगात सगळीकडेच होत असते. किंबहुना 'पॉन्झी स्कीम' हे नावदेखील चार्ल्स पॉन्झी या इटलीच्या इसमाने 1920 च्या सुमारास अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा करून लोकांना गंडवले होते. तेथे त्याला तीनदा एकूण 17 वर्षांसाठी तुरुंगातही धाडले होते. पण त्यानंतरही त्याचा फसवणुकीचा धंदा न थांबल्याने तो शिक्षा भोगत असतानाच 1934 मध्ये त्याला अमेरिकेतून हद्दपार केले. वास्तविक याअगोदरही फसवणुकांच्या ठेव योजनांचे अनेक गुन्हे झालेही होते. पण पॉन्झीच्या फसवणुकीचा पसारा अमेरिकेत एवढा मोठा होता की अशा योजनांना 'पॉन्झी स्कीम्स' असे म्हटले जाते.

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, किती होणार पॉन्झी स्कीम्स चालवणाऱ्यांना शिक्षा...

बातम्या आणखी आहेत...