आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानींनी पत्ते खोलले, सांगितला 60 हजार कोटींचा प्लॅन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुकेश अंबानी आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहेत. मुकेश अंबानी म्हणाले, त्यांची कंपनी पुढच्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्रात एक इंटीग्रेटेड डिजिटल इंडस्ट्रियल एरिया निर्माण करणार आहे. कंपनी यावर 60,000 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. हा देशातील पहिला आपल्यापद्धतीचा डिजिटल इंडस्ट्रियल एरिया असणार आहे. अंबानींनी असाही दावा केला की चीनने जागतिक अर्थव्यवस्थेत मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. भारत सेवा क्षेत्रात हाच दबदबा निर्माण करु शकतो. 

 

अंबानींचा 60 हजार कोटींचा प्लॅन 
- मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, की रिलायन्स आपल्या ग्लोबल पार्टनरसोबत मिळून येत्या 10 वर्षांत महाराष्ट्रात 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. हा देशातील पहिला इंटिग्रेटेड डिजिटल इंडस्ट्रियल एरिया असणार आहे. 
- अंबानी म्हणाले, की रिलायन्स सोबत 20 ग्लोबल कंपनी हे पाऊल उचलत आहे. यामध्ये नोकिया, एचपी, डेल, सिस्को, सीमेंट सारख्या कंपन्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...