आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीनंतरचे नुकसान भरून काढण्यासाठी लघु उद्योगांना 3 हजार 700 कोटींची तरतूद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. देशाचा हा 88 वा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. तसेच मोदी सरकारचा हा पाचवा आणि शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असून जीएसटी लागू झाल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे.

 

मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर झालेले नुकसान भरून काढण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्‍यात आली आहे. नुकसान भरून काढण्यासाठी लघु उद्योजकांसाठी 3 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. टेक्सटाइल सेक्टरसाठी 7150 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.

 

मुद्रा योजनेतून तरुणांना उद्योग उभा करण्यासाठी 3 लाख कोटी रुपये कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्टार्टअप फंडसाठी अधिक सुधारणा करण्यात येणार असून अनुसूचित जमातींसाठी 39,135 कोटी रुपयांची घोषणा करण्‍यात आली आहे.

 

सरकारी योजनांचा महत्त्वाचा भाग नोकऱ्या उत्पन्न करणे असून 70लाख नव्या नोकर्‍या उपलब्ध करून देण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले आहे. नव्या कर्मचाऱ्यांना EPF मध्ये सरकार 12 टक्के योगदान देणार आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांना EPF मध्ये 3 वर्षापर्यंत 8 टक्के सरकारचे योगदान असेल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...