Home | Business | Industries | Three Reasons People Quit Their Job And Keep On Changing

फक्त पैसाच नव्हे, या 3 प्रमुख कारणांमुळे जॉब सोडतात लोक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 14, 2018, 03:25 PM IST

ताजा संशोधनात आजकाल लोक एकाच कंपनीत वर्षानुवर्षे काम करण्यापेक्षा वेळोवेळी जॉब बदलण्याला प्राधान्य देत आहेत.

 • Three Reasons People Quit Their Job And Keep On Changing

  नवी दिल्‍ली - ताजा संशोधनात आजकाल लोक एकाच कंपनीत वर्षानुवर्षे काम करण्यापेक्षा वेळोवेळी जॉब बदलण्याला प्राधान्य देत आहेत. पगार आणि फायदे, करिअरमध्ये पुढे जाणे, नव-नवीन चॅलेंज स्वीकारणे इत्यादींसाठी लोक नोकरी बदलत असतात. पण, अनेकवेळा ह्या सर्व सुविधा असतानाही लोक आपली कंपनी किंवा संस्था सोडतात. कितीही चांगली सॅलरी मिळाली, तरी त्यांचे मन कामात लागत नाही. सीएनबीसीने एका संशोधनाच्या दाखल्यासह दिलेल्या वृत्तानुसार, त्याची काही प्रमुख कारणे सांगण्यात आली आहेत.


  1. कम्‍युनिकेशन
  संवाद खराब असणे किंवा संवादाचा आभाव नोकरी सोडण्याचे प्रमुख कारण आहे. अनेक कंपन्यांमध्ये धोरण अचानक बदलले जाते. कर्मचाऱ्यांना त्याची पूर्व कल्पना दिली जात नाही. एखादी योजना लागू झाली तरीही त्याची माहिती करून दिली जात नाही. यासोबतच बॉस आणि कर्मचारी यांच्यात संवादाची कमतरता यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण होतो.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर दोन प्रमुख कारणे...

 • Three Reasons People Quit Their Job And Keep On Changing

  2. स्वातंत्र्य नसणे
  कर्मचाऱ्यांकडे आप-आपले सल्ले आणि नव-नवीन आयडिआ असतात. बैठका आणि चर्चांच्या माध्यमातून ते आपल्या व्यवस्थापकाला सांगत असतात. पण, त्यांना कंपनीच्या धोरणांचा दाखला देऊन ते सल्ले नकारले जातात. मग, तो कितीही चांगला असला तरीही कंपनीच्या नियमात बसत नसल्याचे सांगितले जाते. या कंपन्या आणि वरिष्ठ काळानुरूप बदलण्यासाठी तयार नसतात. अशातच कर्मचाऱ्यांच्या मनात जॉब सोडण्याचा विचार येतो. प्रत्येकाची गरज वेगळी असू शकते. युवा कर्मचाऱ्यांना जिम आणि एंटरटेनमेंट हवे असते तर ज्येष्ठांचे सेविंग्स आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव असतात.

 • Three Reasons People Quit Their Job And Keep On Changing

  3. काम करूनही किंमत नाही
  कर्मचारी आपल्या कंपनीशी एकनिष्ठ राहून काम करतात. आपली कंपनी पुढे कशी जाईल, आपल्या स्पर्धकाला मागे कसे टाकता येईल यावर ते दिवसभर मेहनत घेतात. प्रामाणिक आणि होतकरू असतानाही काही वेळा अशा कर्मचाऱ्यांवर व्यवस्थापनाचे लक्ष नसते. आपली क्रिएटिव्हिटी वाया जात असल्याची भावना त्यांच्या मनात येते. अशा कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपन्या आणि संस्थांमध्ये मागण्या असतात. आपले 100 टक्के देऊनही किंमत नसल्याचे पाहून ते जॉब सोडतात. 

   

Trending