Home | Business | Industries | these 5 problems are coming in the smartphone then your phone is hacked

स्मार्टफोनमध्ये येत आहेत या 5 अडचणी, तर समजा हॅक झाला तुमचा फोन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 16, 2018, 04:26 PM IST

आजच्या युगात जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन आहे. त्यामध्ये आता एक नवीन अडचण येत आहे. ती म्हणजे फोन हॅक होणे.

 • these 5 problems are coming in the smartphone then your phone is hacked

  नवी दिल्ली - आजच्या युगात जवळपास सर्वांकडे स्मार्टफोन आहे. त्यामध्ये आता एक नवीन अडचण येत आहे. ती म्हणजे फोन हॅक होणे. याबद्दल अनेक वेळेस लोकांना माहितीही होत नाही की, आपला फोन हॅक झाला आहे. यामध्ये आपल्या फोनधील वयक्तीक माहितीच नाहीतर आर्थिकदृष्ट्याही नुकसान पोहचवते. टेक एक्सपर्ट मुकेश सिंह यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत ज्याने आपण ओळखू शकता की, आपला फोन हॅक झाला आहे.

  1. अज्ञात अॅप

  सर्वात पहिले आपण हे चेक करा की, फोनमध्ये एखादे अज्ञात अॅप तर नाही ना. अनेकवळेस डाऊनलोडवेळी हॅकर्स आपल्या फोनमध्ये आपले घर करत नवीन अॅप इंस्टॉल करतात. जे आपल्या फोनमधील डेटा चोरण्याचे काम करतात.

  पुढील स्लाइवडर वाचा, फोनमध्ये असे बदलाव दिसले व्हा सावधान...

 • these 5 problems are coming in the smartphone then your phone is hacked

  2. पॉपअप जाहिराती

  हॅक झालेल्या फोनमध्ये अचानक पॉपअप जाहिरातींची संख्या वाढू लागते. जेव्हा आपण इंटरनेट सर्फींग कराल तेव्हा आपल्याला एवढ्या अडचनी येतात की, फोनचा उपयोग करने अवघड होते. हे पॉपअप आपल्याला नवनवीन अॅप इंस्टॉल करण्याची सल्ला देतात.

   

  पुढील स्लाइवर, लॉक फोन मागतात पैसे...

 • these 5 problems are coming in the smartphone then your phone is hacked

  3. पैशांची मागणी
  काही हॅकर्स असे धोकादायक असतात की, आपल्या फोनवर पूर्णपणे अधिकार गाजवतात आणि पैशांची मागणी करतात. ते आपल्याला ऑनलाइन पेमेंट आणि खरेदीसाठी प्रेरीत करतात. एवढेच नाहीतर, आपल्या फोनचे बॅलेंस ऑटोमॅटिक डिडक्ट होते. नाहीतर बील वाढवून येते.

   

  पुढील स्लाइवडर, ऑटोमॅटिक उघडले अॅप...

 • these 5 problems are coming in the smartphone then your phone is hacked

  4. फोनचा व्यवहार बदलेल

  स्मार्टफोन हॅक होण्याचे एक हेही लक्षण आहे की, विचित्र अडचणी येणे. आपण फोन बंद कराल तरीही हे स्वत: अॅप्लीकेशन उघडते.  एवढेच नाहीतर फोनचा डेटाही अधिक डिडक्ट होतो.

  पुढील स्लाइडवर, पुन्हा-पुन्हा डाऊनलोडिंग सुरू होते

 • these 5 problems are coming in the smartphone then your phone is hacked

  5.पुन्हा-पुन्हा डाऊनलोडिंग
  हॅक होण्याचे हेही एक लक्षण आहे की, फोनमध्ये ऑटोमॅटिक अॅप डाऊनलोडिंग होण्यास सुरूवात होते. आपण डाऊनलोडिंग थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ते थांबत नाही. जर ते थांबले तरीही पुन्हा सुरु होईल. हॅकिंगनंतर फोन गरम होण्याच्या तक्रारीही अधिक असतात.

Trending