Home | Business | Industries | Queen Of Youtube And Make Profit Upto 1.5 Crore Per Month

तुम्हालाही अशी करता येईल घरबसल्या कमाई, ही तरूणी कमावते महिना 1.5 कोटी; वाचा कसे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2018, 12:00 AM IST

23 वर्षांच्या या तरुणीने बनवलेले व्हिडिओ टीनएजर्स मुले आणि मुलींमध्ये खूप पॉप्युलर होत आहेत. तिची पॉप्युलॅरिटी एवढी आहे

 • Queen Of Youtube And Make Profit Upto 1.5 Crore Per Month

  नवी दिल्ली - 23 वर्षांच्या या तरुणीने बनवलेले व्हिडिओ टीनएजर्स मुले आणि मुलींमध्ये खूप पॉप्युलर होत आहेत. तिची पॉप्युलॅरिटी एवढी आहे की लाखो लोक या तरुणीने बनवलेले व्हिडिओ यूट्यूबवर रेग्युलर पाहत आहेत. ही आहे 23 वर्षांची करिना ग्रेसिया, जी अमेरिकासहित अनेक देशांत खूप प्रसिद्ध झाली आहे. तिच्या व्हिडिओजना एवढे प्रेक्षक मिळत आहेत की मोठमोठ्या कंपन्या तिला स्पॉन्सर करायला लागल्या आहेत. न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार, ती या व्हिडिओंच्या माध्यमातून दर महिन्याला 1.5 करोड रुपये कमावतेय. करिना ग्रेसियाला यू-टयूबची नवी क्वीन मानले जात आहे.

  आम्ही या वृत्ताच्या माध्यमातून सांगत आहोत की, करिना ग्रेसिया कशाप्रकारे एवढी कमाई करत आहे, सोबतच हेही सांगणार आहोत की या पद्धतीने तुम्हीही कशी चांगली इन्कम करू शकता.

  पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, करिना ग्रेसियाच्या कमाईचे सिक्रेट...

 • Queen Of Youtube And Make Profit Upto 1.5 Crore Per Month

  - अमेरिकेतील रहिवासी करिना ग्रेसियाचे व्हिडिओ यू-टयूबवर खूप पॉप्युलर आहेत. यू-टयूबवर नियमितपणे तिचे व्हिडिओ लाखो लोक पाहत असतात. यात 8-10 वर्षांपासून ते 15-16 वर्षांपर्यंतची मुले जास्त आहेत. खरेतर किशोरवयीन मुलांना समोर ठेवूनच करिना स्लाइम व्हिडिओ बनवते. या व्हिडिओंतून ती मुलांना घरच्या घरीच कलरफूल खेळणी बनवण्याबद्दल सांगते.

 • Queen Of Youtube And Make Profit Upto 1.5 Crore Per Month

  अनेक कंपन्या करताहेत स्पॉन्सरशिप
  करिनाने बनवलेले व्हिडिओ इतके जास्त पॉप्युलर आहेत की, तिच्या 20 ते 30 मिनिटांच्या व्हिडिओसाठी अनेक मोठ्या स्पॉन्सरशिप करत आहेत. या कंपन्यांमध्ये कोका कोला आणि डिस्नेसारख्या कंपन्याही सामील आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, करिना महिन्याकाठी 1.5 कोटी रुपयांची कमाई करते. करिना मी म्हणते की, मी आता चांगली कमावत असल्याने माझ्या पालकांना निवृत्ती घ्यायला लावणार आहे.

 • Queen Of Youtube And Make Profit Upto 1.5 Crore Per Month

  6 बेडरूमचे घर केले खरेदी
  स्लाइम व्हिडिओ बनवणे करिनाचा छंद आहे. करिनाने 7 महिन्यांआधी पहिल्यांदा जेव्हा स्लाइम व्हिडिओजच्या माध्यमातून करिअर करण्याचा विचार केला, तेव्हा तिच्या आईवडिलांनी तसेच भावानेही तिला पाठिंबा दिला नव्हता.
  - पण नंतर मात्र तिचे व्हिडिओ हिट होत गेले आणि तिला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळायला लागला. तिचे सबस्क्रायबर्स वाढत गेले तसतशी तिची कमाई वाढत गेली. तिने 6 बेडरूमचे घर खरेदी केले आहे, ज्यात स्विमिंग पूलही आहे. आता तिच्या लाइव्ह शोसाठी व्हीआयपी बुकिंग होते आणि एक तिकीट 6500 रुपयांत विकत आहे.

 • Queen Of Youtube And Make Profit Upto 1.5 Crore Per Month

  यू-ट्यूबद्वारे तुम्हीही करू शकता कमाई
  - तुम्ही तुमचे स्वत:चे यू-ट्यूब चॅनल बनवूनही कमाई करू शकता. तुमच्या जीमेल अकाउंटच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल बनवले जाऊ शकते. चॅनल बनवल्यावर काही असे की-वर्डस टाका ज्यामुळे तुमचे यूट्यूब चॅनल सर्च केल्यावर सहज सापडेल. 
  - तुमचा कंटेट ओरिजनल असण्याबरोबरच कमीत कमी इंटरनेट डाटा लागणारा असावा. सोबतच जाहिराती मिळवण्यासाठी सातत्याने चॅनलवर कंटेट अपडेट करत राहिले पाहिजे.
  - जर तुमच्या चॅनल पाहणाऱ्यांची संख्या वाढली तर याद्वारे कमाई करण्यासाठी व्हिडिओला लवकरात लवकर मॉनिटाइज करायला हवे. व्हिडिओ मॉनिटायजेशनचा अर्थ आहे की तुमच्या व्हिडिओमध्ये गुगल आपल्या जाहिराती चालवू शकेल.
  -यासाठी गुगलचेच अॅडसेन्स अकाउंट बनवावे लागेल, कारण या अकाउंटमध्येच पैसे येतील. अकाउंट उघडण्यासाठी 18 वर्षांहून अधिक वय असणे गरजेचे आहे.

 • Queen Of Youtube And Make Profit Upto 1.5 Crore Per Month

  आपल्या यूट्यूब व्हिडिओचे मॉनिटायजेशन करा
  - यासाठी तुम्हाला तुमच्या यू-टयूब चॅनलच्या डॅशबोर्डवर जावे लागेल. येथून Monetisation tab->"Monetize with Ads" बॉक्सवर क्लिक करा.
  दुसरा पर्याय म्हणजे चॅनल सेटिंग्जवर जा. चॅनल सेटिंगवर जाऊन Monetisation टॅबवर क्लिक करा. यानंतर "Monetize with Ads" बॉक्सवर क्लिक करा. 
  - यू-टयूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जर तुमच्या चॅनलच्या एखाद्या व्हिडिओ खूप व्ह्यूज मिळाले तर तुम्हाला यूट्यूबकडून एक मेल येईल. मेलमध्ये यूट्यूबच्या ज्या व्हिडिओचे नाव असेल, त्या व्हिडिओला अपलोड करण्यासाठी कंपनी तुम्हाला पैसे देईल, परंतु हे फक्त एका व्हिडिओचेच असतील. जाहिराती मिळवण्यासाठी प्रत्येक व्हिडिओला वेगवेगळे मॉनिटाइज करावे लागेल.

 • Queen Of Youtube And Make Profit Upto 1.5 Crore Per Month

Trending