आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - आज तरुणांना डॉक्टर, इंजिनीअर आणि मॅनेजमेंटची डिग्री घेऊन चांगली नोकरी, गलेगठ्ठ पगार आणि लक्झरियस लाईफस्टाईल जगण्याची इच्छा असते. शेतकरी होण्याचे स्वप्न शक्यतो कोणीही पाहतांना दिसत नाही. यादरम्यान एका व्यक्तीने वर्षाकाठी 24 लाख रुपयांचे पॅकेज सोडून गावाकडे परतून शेती व्यवसाय निवडला. एक वर्षानंतर या व्यक्तीने एक कृषी कंपनी सुरु केली. आज या कंपनीचा टर्नओव्हर 2 कोटी रुपये आहे. हा व्यक्ती आहे छत्तीसगढ येथील विलासपुर जिल्ह्यातील मेधपर गावातील सचिन काळे.
दिव्य मराठी वेब टीमला बोलतांना सचिन काळे यांनी सांगितले, की शेतीसाठी लागणारा खर्च आणि त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे तरुण शेती करण्यास धजावत नाहीत. बहुतांश तरुण शिकून शहरांमध्ये नोकरीला प्राधान्य देतात. या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आजोबांकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे काहीतरी नवे करण्याची जिद्द निर्माण झाली.
पुढील स्लाईडवर वाचा - नोकरी सोडून कसे मिळवले यश
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.