आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- गूगलने आपले स्मार्ट स्पीकर भारतात लॉन्च केले आहेत. भारतात गूगल होमची किंमत 9.999 रुपये आणि गूगल होम मिनीची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की, या दोन्ही स्पीकरचा सेल ऑनलाईन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि 750 रिटेल स्टोअरद्वारे सुरु करण्यात येईल. गुगलची टक्कर भारतात काही महिन्यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या अॅमेझॉनच्या इको, इको डॉट आणि इको स्मार्ट स्पीकरसोबत होण्याची शक्यता आहे.
गूगल होम गूगल असिस्टंटवर रन होईल. जर तुम्ही Google Home खरेदी केले तर तुम्ही ते तुमच्या डिव्हाइस सोबत इंटरॅक्ट करु शकता. व्हॉइस प्रेझि़डंट ऑफ प्रोडक्ट मॅनेजमेंट आणि जीएम ऋषी चंद्रा यांनी सांगितले की भारतीय उच्चार लक्षात घेऊन गुगलने हे प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. कंपनीचा दावा आहे की, यावर्षाच्या शेवटी स्मार्ट स्पीकरला हिंदीचा सपोर्टही देण्यात येईल.
फ्लिटकार्टवर गूगल होम आणि गूगल होम मिनी सोबत लॉन्च ऑफरही देण्यात आली आहे. या अंतर्गत प्रॉडक्ट खरेदीवर जिओफाय राऊटर मोफत मिळेल. याशिवाय तुम्ही जर रिलायन्स डिजिटल किंवा माय जिओ स्टोअरमधून खरेदी केली तर तुम्हाला 100 जीबी हाय-स्पीड 4 जी डाटासोबत एक जिओफाय राउटर मोफत मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.