Home | Business | Industries | Reliance announced many offers in 41st Annual General Meeting

15 वर्षांनंतर पुन्हा रिलायन्सची 501 रुपयांत फोनची ऑफर, जुन्या फोनच्या मोबदल्यात मिळणार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 05, 2018, 02:41 PM IST

अनेक भाषांत व्हाइस कमांडची सुविधाही जियो फोनमध्ये देणार असल्याचेही मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

 • Reliance announced many offers in 41st Annual General Meeting

  मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी गुरुवारी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. जियोने 22 महिन्यांत कस्टमर बेस दुपटीने वाढवल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय जियोफोनवर व्हाइस कमांडवर यूट्यूब, व्हाट्सअॅप आणि फेसबूकचे अॅप चालतील असेही त्यांनी सांगितले. अनेक भाषांत व्हाइस कमांडची सुविधाही जियो फोनमध्ये देणार असल्याचेही मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. जियोने गिगा टीवी फॅसिलिटी लाँच केली आहे. त्यात अल्ट्रा एचडीबरोबर एंटरटेनमेंट फिचर असतील.

  मॉन्सून हंगामा ऑफर जुलै 21 पासून
  मुकेश अंबानींनी सांगितले की, जियो फोनवर 15 ऑगस्टपासून यू ट्यूब, फेसबूक, व्हाट्सअॅप मिळेल. जियो फोन मान्सून हंगामा ऑफर जुलै 21 पासून सुरू होईल. सध्याच्या फोनच्या मोबदल्यात 500 रुपयांत नवा फोन मिळेल. 1 जुलै 2013 मध्ये रिलायन्स इन्फोकॉमने 501 रुपयांत मोबाईल फोन लाँच केला होता. त्यावेळी ही मोबाईल क्रांती म्हटली गेली. त्यावेळी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी एकत्र होते. हा सीडीएमए तंत्रज्ञानावर आधारित फोन होता. त्याचबरोबर 149 आणि 249 रुपयांचे सबस्क्रायबर पॅक होते. या पॅकला धीरूभाई अंबानी पायोनियर ऑफर नाव दिले होते.

  जियो गिगा टिव्हीही लाँच

  मुकेश अंबानींनी यादरम्यान जियो गिगा टिव्हीचेही लाँचिंग केले. हे गिगा फायबर सर्व्हीसच्या मदतीने चालेल. त्यांनी सांगितले की, या टिव्हीवर जगातील बेस्ट एज्केयुशनल कंटेंट मिळेल. त्याचबरोबर याच्या मदतीने मुले शिक्षकाच्या मदतीशिवाय शिक्षणही घेऊ शकतील. याच टिव्हीच्या मदतीनेच डॉक्टर लांब बसून रुग्णांचा उपचार करू शकतील.

  नफ्यात 20.6% वाढ
  मुकेश अंबानींनी सांगितले की, रिलायन्स जियोचा नफा 20.6% म्हणजे 36 हजार 75 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्स भारताची सर्वात मोठी एक्सपोर्टर कंपनी बनली आहे. एका वर्षात कंपनीने 42 हजार 553 कोटी रुपये जीएसटी भरणा केला आहे. गेल्यावर्षी 35 कोटींहून अधिक ग्राहक आले. गेल्यावर्षी 69,000 कोटींचा रेव्हेन्यू मिळाला आणि 4,000 नवे स्टोर सुरू करण्यात आले.

 • Reliance announced many offers in 41st Annual General Meeting
 • Reliance announced many offers in 41st Annual General Meeting
 • Reliance announced many offers in 41st Annual General Meeting

Trending