कधीकाळी करायचा 8 हजाराची नोकरी, आज कमवत आहे 3.5 लाख रुपये महिना
शिक्षणानंतर अनेक जण पहिला विचार हा नोकरीचा करतात. मध्य प्रदेशातील एका युवकानेही असेच केले. मात्र नोकरीत मन र
-
नवी दिल्ली- शिक्षणानंतर अनेक जण पहिला विचार हा नोकरीचा करतात. मध्य प्रदेशातील एका युवकानेही असेच केले. मात्र नोकरीत मन रमत नसल्याने त्याने दोन महिन्यांचा एक ट्रेनिंग कोर्स केला. ट्रेनिंगनंतर या युवकाचे जीवन असे बदलले की तो आज दरमहा 3.5 लाख रुपये कमवत आहे.
ट्रेनिंगने बदलले जीवन
मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात राहणाऱ्या लखनसिंह सेमिल यांनी सांगितले की, अॅग्रीकल्चरमध्ये बीएस्सी केल्यानंतर त्यांनी 8 हजार रुपये महिना पगार देणारी नोकरी स्वीकारली होती. नोकरी करताना त्यांच्या लक्षात आले की शेतकऱ्यांची शेती करण्याची पध्दत योग्य नसून यामुळे पाणी वाया जात आहे. पाण्याची बचत आणि शेतीचा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी सरकारची मदत घेतली. ट्रेनिंगमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला.सरकार देत आहे ट्रेनिंग
शेतकऱ्यांच्या समस्या दूर करुन शेतीत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अॅग्री क्लिनिक किंवा अॅग्री बिझनेस सेंटरचे ट्रेनिंग घेणाऱ्या व्यक्तीला बिझनेस सुरु करण्यासाठी बॅंकेतुन सहज कर्ज मिळते.पुढे वाचा...
-
प्रोटेक्टेड कल्टिवेशनची मिळाली कन्सेप्ट
- लखन यांनी सांगितले की, त्यांना प्रोटक्टेड कल्टिवेशनची कन्सेप्ट खूपच आवडली. त्यासाठी त्यांनी सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या ट्रेनिंगमध्ये भाग घेतला. तेथे त्यांनी पॉलीहाऊस कल्टिवेशन ट्रेनिंग कोर्स पुर्ण केला. पॉलीहाऊसद्वारे केलेल्या शेतीमुळे दुप्पटीहून अधिक फायदा होतो.काय असते पॉलीहाऊस शेती
हा जैविक शेतीचाच एक भाग आहे. पॉलीहाऊसमध्ये स्टील, लाकूड, बांबू किंवा अॅल्यूमिनियम फ्रेमचे स्ट्रक्चर बनविण्यात येते. शेती असलेली जमीन घरासारख्या आकारात पारदर्शी पॉलीमरने झाकण्यात येते. पॉलीहाऊसच्या आतमध्ये बाहेरची हवा किंवा पाणी जाऊ शकत नाही. यामुळे किडीचा धोकाही कमी असतो. तापमानही गरजेनुसार कमी-जास्त करण्यात येते. अशा रितीने सर्व काही नियंत्रित केले जात असल्याने किती उत्पादन मिळेल याचाही अंदाज येतो.पुढे वाचा...
-
कंपनीचा टर्नओव्हर 4 कोटी रुपये
ट्रेनिंग पुर्ण झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांना पॉलीहाऊस तंत्रज्ञानाबद्दल सांगितले. आता ते स्वत: पॉलीहाऊस कन्स्लटंट झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ते पॉलीहाऊसचे डिझाईन करुन ते उभारुन देतात. एका एकरात पॉलीहाऊस उभारण्यासाठी जवळपास 1.25 लाख रुपये खर्च येतो. त्यावर सरकारचे जवळपास 50 ते 60 टक्के अनुदान मिळाले. शेतकरी जागरुक झाल्याने आता त्यांचा व्यवसाय वाढत आहे. त्यांच्या व्यवसायाची उलाढाल आता 4 कोटींवर पोहचली आहे.वर्षाला करत आहे 40 लाखाची कमाई
लखन यांचे म्हणणे आहे की तुम्ही टॉमेटो, कोबी असे उत्पादन घेऊ शकता. त्यांना वार्षिक उलाढालीवर जवळपास 10 टक्के म्हणजेच 40 लाखाचा नफा होतो. त्यांच्यामुळे 15 ते 20 जणांना रोजगारही मिळत आहे.