Home | Business | Industries | 5 indication of become rich

या 5 गोष्टी सांगतात तुम्ही होऊ शकता श्रीमंत, ही संधी गमावू नका

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 26, 2018, 02:08 PM IST

श्रीमंत होणे हे नशीबावर नव्हे तर तुमच्या आर्थ

 • 5 indication of become rich

  नवी दिल्ली- श्रीमंत होणे हे नशीबावर नव्हे तर तुमच्या आर्थिक रणनितीवर अवलंबून असते. व्यवस्थापन आणि करिअरशी निगडित जगभरातील एक्सपर्टही हेच सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला श्रीमंत व्हायचे असल्याचे तुम्ही स्वत:च ठरवत असता. तुमचे विचार, वर्तन, दृष्टीकोन आणि सवयी याकडे इशारा करतात की तुम्ही श्रीमंत होणार आहात की नाही.

  या गोष्टी घ्या समजून
  entrepreneur.com च्या एक अहवालानुसार जीवन नेहमीच तुम्हाला श्रीमंत होण्याची संधी आणि इशारे देत असते. हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही या संधीचा फायदा घेता की नाही. आम्ही तुम्हाला अशाच काही संधींविषयी माहिती देणार आहोत. ज्या संधी तुम्ही गमावल्या नाहीत तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता. पण तुम्ही या संधी गमावल्यात तर तुम्ही श्रीमंत होण्यापासून दुर जात आहात, असे म्हणावे लागेल.

  नंबर-1: कमी वयात कमाईची संधी
  काय आहे फंडा: अहवालानुसार, तुमची श्रीमंत होण्याची इच्छा असल्यास लहान वयात कमाईची संधी सोडू नका. लहान वयात तुम्ही कमावलेले पैसे तुम्ही गुंतवल्यास ते दीर्घकाळात मोठे होऊ शकतात. तुम्ही कमी वयात केलेली गुंतवणूकच तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती बनवेल. तुम्हाला याचे उदाहरण म्हणून बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग आणि वॉरेन बफे यांच्याकडे पाहता येईल.

  पुढे वाचा: पुढील स्लाईडवर

 • 5 indication of become rich

  नंबर-2: कोणत्या नव्या व्यवसायात स्वत:ला आजमवण्याची संधी

   


  काय आहे फंडा: बीबीसी कॅपिटलच्या एका अहवालानुसार, नव्या पध्दतीचा व्यवसाय तुम्हाला नेहमी श्रीमंत होण्याची संधी देत असतो. कारण असा व्यवसाय वाढण्याची संधी 2 हजार टक्के अधिक असते. अर्थातच अशा व्यवसायात नुकसान होण्याची शक्यताही तितकीच असते. पण नुकसानीच्या भयाने व्यवसाय न करणे हे बुध्दीमान व्यक्तीचे लक्षण नाही.

 • 5 indication of become rich

  नंबर-3: इनोवेशनची संधी


  काय आहे फंडा: रातोरात श्रीमंत होणे हे परिकथेसारखे आहे. पण इनोवेशनने हे शक्य आहे. अमेरिकेसह जगभरात काही जण अशाच पध्दतीने श्रीमंत झाले. फेसबुक, गूगल, अॅपलसह भारतात पेटीएम, फ्लिपकार्ट, ओला आणि पैक्‍ट्रो सारख्या कंपन्या कमी गुंतवणूकीत आणि लहान जागेत सुरु झाल्या होत्या. इनोवेशनच्या जोरावर काही वर्षातच याचे संस्थापक श्रीमंत झाले. 
   

 • 5 indication of become rich

  नंबर-4: भविष्यात गुंतवणूक करा

   


  काय आहे फंडा: बीबीसी कॅपिटलच्या अहवालानुसार, श्रीमंत अधिक श्रीमंत का होतात या प्रश्नाचे उत्तर ते भविष्यात गुंतवणूक करतात हे आहे. काळानुसार त्याचा आकार आणि नफाही वाढतो. 
   

 • 5 indication of become rich

  नंबर-5: विशेष प्रकारच्या प्रॉपर्टीत गुंतवणूक
   

  काय आहे फंडा:  entrepreneur इंडियाच्या अहवालानुसार, खास गोष्टी जसे की आर्ट वर्क किंवा कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी असेल त्यापासून मागे हटू नका. याला कारण यातून चांगला पैसा मिळतो. अशा प्रकारच्या गुंतवणूकीत कोणताही ऑपरेशनल खर्च नसतो.  
   
     

   

   

Trending