Home | Business | Industries | 6 countries has below 15k return airfare from India

या 6 देशात येण्या-जाण्याचे विमानाचे तिकीट 15,000 रुपयांहून कमी, तुम्हीही घ्या फायदा

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 20, 2018, 11:51 AM IST

उन्हाळ्यात परदेशात फिरण्याचे प्लॅनिंग तुम्ही केवळ महागड्या विमान तिकीटामुळे मागे टाकत असाल तर तुमच्यासाठी एक

 • 6 countries has below 15k return airfare from India
  या देशात येण्या-जाण्याचे फ्लाईट तिकीट 15 हजार रुपयांहूनही कमी किंमतीत उपलब्ध आहे.

  नवी दिल्ली- उन्हाळ्यात परदेशात फिरण्याचे प्लॅनिंग तुम्ही केवळ महागड्या विमान तिकीटामुळे मागे टाकत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आम्ही तुम्हाला अशा 6 देशांविषयी माहिती देत आहोत जेथे येण्या-जाण्याचे विमान तिकीट 15,000 रुपयांहूनही कमी आहे. यामुळे तुम्ही अतिशय कमी खर्चात तुमचे परदेशवारीचे स्वप्न साकारू शकता.

  मलेशिया


  - दिल्ली ते मलेशियाचे रिटर्न एअरफेअर- 11,858 रुपयांपासून सुरु
  - दिल्ली ते क्लालालंपूर येण्या-जाण्याचे तिकीट 11,858 रुपयात मिळत आहे. एअर एशिया या मार्गावर लो एअरफेअर फ्लाईट चालवते.

  श्रीलंका


  - दिल्लीहून श्रीलंकेचे रिटर्न एअरफेअर – 13,210 रुपयांनी सुरू

  भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय देश हा श्रीलंका आहे. श्रीलंकेचा समुद्रकिनारा हा अतिशय सुंदर आहे. येथील चलनही भारतापेक्षा स्वस्त आहे. दिल्ली ते श्रीलंका येण्या-जाण्याचे तिकीट 13,210 रुपये आहे.

  थायलंड


  दिल्ली ते थायलंडचे रिटर्न एअरफेअर – 13,600 रुपयांनी सुरू

  भारतीयांमध्ये थायलंडचे बँकॉक हे शहर लोकप्रिय आहे. तेथे दरवर्षी हजारो भारतीय पर्यटनासाठी जातात. येथे भारतीयांसाठी व्हिसा ऑन अरायवलची सुविधा आहे. दिल्लीहून थायलंडला येण्या-जाण्याचे विमानतिकीट 13,600 रुपयांमध्ये मिळत आहे. थायलंडमध्ये तुम्हाला बजेट हॉटेल सहज मिळू शकते.

  पुढे वाचा: आणखी काय आहेत पर्याय...

 • 6 countries has below 15k return airfare from India

  नेपाळ
  - दिल्ली ते काठमांडूपर्यंतचे रिटर्न एअरफेअर 13,522 रुपयांपासून सुरु होते. 

   

  भारतीयांना नेपाळला जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसाची गरज नसते. येथे तुम्ही भारतीय ओळखपत्राद्वारे फिरु शकता. नेपाळमध्ये नगरकोट, काठमांडू, भक्तापूर आणि पुराना बाजार हे भाग फिरण्यास तुम्ही विसरु नका. दिल्लीहून नेपाळला येण्या-जाण्याचे तिकीट तुम्हाला 13,000 ते 14,500 रुपयात तुम्हाला मिळेल.

   

   

  दुबई
  - दिल्ली ते दुबईचे रिटर्न एअरफेअर- 15,000 रुपयांनी सुरू

  दुबई शॉपिग हब म्हणून ओळखले जाते. येथे रेडीमेट गारमेंट पासून ज्वेलरी शॉपिंगचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. दुबईत पाल्म ट्री, खलीफा बुर्ज, बीच आणि दुबई नाइट सफारी सारखे अनेक पर्याय फिरण्यासाठी उपलब्ध आहेत. दिल्लीहून दुबईला येण्या-जाण्याचे तिकीट 13,512 रुपये आहे.

   

   

  पुढे वाचा: आणखी काय आहेत पर्याय... 

 • 6 countries has below 15k return airfare from India

  सिंगापूर
  - दिल्ली ते सिंगापूरचे रिटर्न एअरफेअर- 14,469 रुपयांपासून सुरु होते.

   

  दिल्लीहून सिंगापूर येण्या-जाण्याचे विमान तिकीट 14,469 रुपयात मिळते. सिंगापूर हे महागडे शहर असून येथील चलनही महागडे आहे. येथे फिरण्याचे आणि शॉपिगचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. भारतीयांमध्ये हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

   

  असे बुक करा स्वस्त एअरफेअर
  - वीकेंड ऐवजी वीकडेचे तिकीट बुक करा. वीकेंडच्या तुलनेत मंगळवार ते गुरूवार या कालावधीत तिकीट स्वस्तात मिळते. 
  - फ्लाईटचे तिकीट कमीत कमी 2 महिने अगोदर बुक करा.
  - एअरफेअर शक्यतो थेट एअरलाईन्स कंपन्याच्या संकेतस्थळावर जावून चेक करा. अनेकदा कंपन्या फ्लाईट 100 टक्के बुक करण्यासाठी शेवटच्या क्षणी डिस्काउंट देतात. 

Trending