Home | Business | Industries | all about government jan aushadhi kendra

अतिशय महागडी औषधे या 5 ठिकाणी मिळतात 60% स्वस्तात, तुम्हीही घ्या फायदा

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 09, 2018, 01:44 PM IST

अनेकदा सर्वसामान्यांसाठी महागडी औषधे घेणे जिकरीचे असते. सरकारी नियंत्रण असतानाही औषधांच्या किंमती सातत्याने

 • all about government jan aushadhi kendra

  नवी दिल्ली- अनेकदा सर्वसामान्यांसाठी महागडी औषधे घेणे जिकरीचे असते. सरकारी नियंत्रण असतानाही औषधांच्या किंमती सातत्याने वाढतच आहेत. एका अहवालानुसार अनेक औषधांमध्ये मोठया प्रमाणात नफेखोरी असून ती जवळपास 1700 टक्के आहे.

  5 रुपयांचे औषध 106 रुपयांना
  एनपीपीएचे उपसंचालक आनंद प्रकाश यांच्या अहवालानुसार, अनेक खासगी रुग्णालये 5 रुपयाचे औषध एमआरपी 106 रुपये करुन देत आहेत. तर सीरिंजसुध्दा 13.64 रुपयांचे एमआरपी 189.95 करुन दिले जात आहे. अहवालात अशी शेकडो औषधे आहेत ज्यावर 250 ते 1737 टक्के मार्जिन देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्याना ही औषधे घेणे अशक्य ठरत आहे. आवाक्याबाहेर गेलेल्या औषधाच्या किंमती पाहिल्यावर ते स्वस्तात कुठे मिळू शकते याचा आम्ही शोध घेतला. अशी काही दुकाने आहेत तेथे तुम्ही ही औषधे स्वस्तात घेऊ शकता.

  पुढे वाचा: कुठे मिळू शकतात तुम्हाला स्वस्तात औषधे...

 • all about government jan aushadhi kendra

  1 जन औषधी‍ केंद्रे


  - जर तुम्हाला महागडी औषधे घेणे शक्य होत नसेल तर तुम्ही जन औषधी केंद्रात जा. लोकांना स्वस्तात औषधी उपलब्ध व्हावीत यासाठी मोदी सरकारने देशात जवळपास 3 हजार जनऔषधी केंद्रे सुरु केली आहेत. येथील औषधाच्या किंमतीमधील फरक तुम्हाला लक्षात यावा यासाठी आम्ही तुम्हाला उदाहरण देत आहोत. येथे तुम्हाला 130 रुपयांची क्रीम तुम्हाला 20 रुपयात मिळेल. तुम्हाला 30 रुपयात मिळणारी गोळी येथे अवघ्या 3 रुपयात मिळेल. Aceclofenac + Paracetamol चे 10 गोळ्यांचे पाकीट बाजारात 30 रुपयांना मिळते. जनऔषधी केंद्रात हे तुम्हाला फक्त 3 रुपयात मिळेल. कैलामाईन लोशन 20 एमएल हे बाजारात 160 रुपयांना मिळते. तेच तुम्हाला जनऔषधी केंद्रात 20 रुपयांना मिळेल.

   

  पुढे वाचा: कसे शोधाल जनऔषधी केंद्र

 • all about government jan aushadhi kendra

  कसे शोधाल जनऔषधी केंद्र
  तुम्ही https://janaushadhi.gov.in या संकेतस्थळावर जाऊन जनऔषधी केंद्र शोधू शकता. तुम्हाला त्यासाठी STORES सेक्शनमध्ये जावे लागेल. जर तुम्ही डेस्कटॉपवरुन हे संकेतस्थळ पाहात असाल तर डाव्या बाजूला तुम्हाला पूर्ण यादी देण्यात आली आहे. कोणत्या राज्यात किती केंद्र आहेत याचीही माहिती देण्यात आली आहे. तुम्ही त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. दुकानाचा पत्ता आणि फोन नंबरही यात देण्यात आला आहे. 

  मोबाईलवर असे शोधा
  तुम्ही मोबाईलवर हे संकेतस्थळ पाहात असाल तर तुम्हाला थोडा जास्त शोध घ्यावा लागेल. तुम्हाला स्टोअरवर क्लिक केल्यावर पंजाबमधील जनऔषधी केंद्रांची लिस्ट दिसेल. त्यानंतर खाली राज्यवार लिस्ट दिसेल.
   

  पुढे वाचा: आणखी कुठे मिळू शकतात स्वस्तात औषधे

 • all about government jan aushadhi kendra

  2 Pharmeasy.in


  येथे सर्व औषधांवर सरसकट20% सूट मिळते. 
  - मधुमेहाच्या औषधांवर 50 % सूट
  - मेडि‍कल सप्‍लाय अॅण्ड इक्‍विमेंट्सवर 50 टक्के 
  - वेलनेस प्रोडक्‍टवर 20 % सूट 
  - पर्सनल केअरवर 50 % सूट


  3 Zotezo.com
  येथे सर्व औषधांवर सरसकट 20% सूट मिळते. याशिवाय ऑफर झोनमध्ये हेल्‍थ प्रोडक्‍ट्सवर 82 % सूट मिळते.


  4 Netmeds.com
  येथे सगळ्या औषधांवर सरसकट 15% सूट मिळते. याशिवाय 20% टक्से सुपर कॅश मिळते. औषधांवर सरसकट 20% सूट देणारी वेगळी ऑफर आहे.

   
  5     1mg.com
  येथे सगळ्या औषधांवर सरसकट 20% सूट आहे.याशिवाय मधुमेह, वेलनेस आणि हेल्‍थ प्रोडक्‍ट्सवर डि‍स्‍काउंट ऑफर्स आहे.

   

   

   

   


   

   

   

Trending