Home | Business | Industries | amazing success story of electrical company havells india

शिक्षकी सोडून वडिलांनी सुरू केला Business; मुलाने काही तासांत कमवले 3500 कोटी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 24, 2018, 07:02 PM IST

केंद्र सरकारने काही वस्तू आणि सेवांवर जीएसटी रेट घटवण्याचा निर्णय घेतला. त्याचाच फायदा या कंपनीला झाला आहे.

 • amazing success story of electrical company havells india

  नवी दिल्ली - वडिलांनी शिक्षकाची नोकरी सोडून बिझनेस सुरू केले. आपल्या मेहनतीवर त्यांनी काही वर्षांतच तोट्यात चालणाऱ्या अनेक कंपन्या विकत घेतल्या आणि अब्जावधींचा एम्पायर उभा केला. त्यांच्याच मुलाने आता अवघ्या काही तासांत तब्बल 3500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रत्यक्षात, केंद्र सरकारने काही वस्तू आणि सेवांवर जीएसटी रेट घटवण्याचा निर्णय घेतला. त्याचाच फायदा या कंपनीला झाला आहे. आम्ही येथे देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल कंपन्यांपैकी एक Havells India संदर्भात बोलत आहोत.

  GST काउन्सिलच्या निर्णयाचा फायदा
  जीएसटी काउन्सिलने शनिवारी झालेल्या बैठकीत टीव्ही, वाटर हीटर, इलेक्ट्रिक आयरनिंग मशीन, रेफ्रिजरेटर, हेअर ड्रायर, व्हॅक्यूम क्लीनर, फूड अप्लायंसेज इत्यादींवरील टॅक्स 28 टक्क्यांवरून 18 टक्के केला आहे. त्यामुळे, हॅवल्स इंडियाच्या शेअरने उसंडी मारली. कंपनीच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांहून अधिक वाढ होऊन प्रति शेअर किंमत 610 रुपयांपर्यंत पोहोचली.

  3500 कोटींनी वाढली हॅवल्सची मार्केट व्हॅल्यू
  सरकारने जीएसटी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने प्रोमोटर आणि सीएमडी अनिल राय गुप्ता यांच्या नेतृत्वातील कंपनीची मार्केट व्हॅल्यू 3500 कोटी रुपयांनी वाढली आहे. शुक्रवारी स्टॉक मार्केटच्या क्लोझिंगला कंपनीची मार्केट व्हॅल्यू 34,700 कोटी रुपये होती. जी सोमवारी अवघ्या तासांतच वाढून 38,200 कोटी रुपये झाली आहे. या कंपनीचा पाया सीएमडी अनिल गुप्ता यांचे वडील कीमत राय गुप्ता यांनी रोवला होता. 2014 मध्ये त्यांचे निधन झाले. कंपनी सुरू करण्यापूर्वी ते एक शिक्षक होते.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, 10 हजार रुपयांचे असे बनवले 38000 कोटी...

 • amazing success story of electrical company havells india

  10,000 रुपये घेऊन दिल्लीत पोहोचले होते कीमत राय गुप्ता
  कीमत राय गुप्ता पंजाबमध्ये एक शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिक्षकी पेशावर ते समाधानी नव्हते. डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन ते 1958 मध्ये दिल्लीत 10 हजार रुपये घेऊन गेले होते. ओल्ड दिल्लीत त्यांनी इलेक्ट्रिकल गुड्स ट्रेडिंगचे दुकान सुरू केले. काही वर्षांतच त्यांना स्वतःची कंपनी स्थापित करण्याचा विचार आला. त्यावेळी हवेली राम गुप्ता यांची कंपनी तोट्यात जात होती. कीमत राय गुप्ता यांनी त्याच कंपनीचे भवितव्य बदलण्याच्या ध्येयासह ती 1971 मध्ये 7 लाख रुपयांत विकत घेतली. 

 • amazing success story of electrical company havells india

  विकत घेतली जगातील चौथी सर्वात मोठी लायटिंग कंपनी
  हॅवेल्सने सर्किट प्रोटेक्शन डिव्हाइस, केबल आणि वायर, मोटर, फॅन, मॉड्युलर स्विच, होम अप्लायंसेज, इलेक्ट्रिक वाटर हीटर्स, पॉवर कॅपेसिटर्स, सीएफएल लँप्ससह देशांतर्गत बाजारात आपली पकड मजबूत केली. यानंतर परदेशी बाजारात पाऊल ठेवले. 2007 मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचा आकार दुप्पट करण्यासाठी सिल्व्हेनिया कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ही जगातील चौथी सर्वात मोठी लायटिंग कंपनी होती. या अधिग्रहणासोबतच हॅवल्स इंडिया जगातील टॉप-5 ची लायटिंग कंपनी बनली. याच्या एका वर्षांनंतरच आलेल्या जागतिक मंदीने कंपनीला मोठा तोटा झाला. परंतु, संपूर्ण ताकदीने हॅवल्सने पुन्हा यश शिखर गाठले. 

Trending