Home | Business | Industries | amazon India is worth more than rs 1 lakh crore

सगळ्यात श्रीमंत व्यक्तीलाही अपयशाने शिकवले धडे, त्यामुळेच आज आहेत यशस्वी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 22, 2018, 12:15 AM IST

जगातील सगळ्या श्रीमंत व्यक्ती आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी भारतीय ई-कॉमर्स मार्केटसाठी आक्रमक रणनित

 • amazon India is worth more than rs 1 lakh crore

  नवी दिल्ली- जगातील सगळ्या श्रीमंत व्यक्ती आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी भारतीय ई-कॉमर्स मार्केटसाठी आक्रमक रणनिती आखली आहे. चीनमधील निराशाजनक कामगिरीनंतर जराही हताश न होता त्यांनी भारतीय बाजारावर लक्ष केंद्रित केले आहे.

  फोर्ब्सच्या अहवालनुसार, सि‍टी रि‍सर्चचे लेखक मार्क मे आणि हू यांनी लिहिले आहे की जेफ बेजोसने गतवर्षी सांगितले की, चीनमधील अपयशाने त्यांना बरेच काही शिकवले आहे. त्या चुका ते भारतात करणार नाहीत. आक्रमकतेचा अभाव आणि पुरेशी गुंतवणूक न करणे या आपल्या चीनमध्ये चुका झाल्याचे त्यांनी मानले.

  भारतासाठी आहे हा प्लॅन
  अमेझॉन इंडियाने पायाभुत सुविधा उभारण्यासाठी आणि विकासासाठी 5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडे पहिल्यापासून 42 फुलफि‍लमेंट सेंटर्स, 150 डि‍लि‍व्हरी स्‍टेशन आणि 25 सोर्टेशन सेंटर्स आहेत. भारताची ई-कॉमर्स बाजारपेठ वाडून पुढील वर्षी 202 अब्ज डॉलरची होईल.

  भारतात 70 अब्ज डॉलर होईल अमेझॉनचा जीएमवी
  भारतात अमेझॉनने 2013 मध्ये एंट्री केली. भारतात कंपनीने 30 टक्के ई-कॉमर्स बाजारपेठेवर कब्जा केलेला आहे. कंपनी 2027 पर्यंत दरवर्षी 23 टक्क्यांनी वाढू शकते. याचाच अर्थ आहे की अमेझॉन इंडियाचा ग्रॉस मर्चेडाईज व्हॉल्यूम (जीएमवी) 70 अब्ज डॉलरवर आणि महसूल 11 अब्ज डॉलरवर पोहचेल.

  भारतीय ई-कॉमर्स मार्केटचे यूनि‍क फीचर
  भारतीय ई-कॉमर्स मार्केटचे यूनिक फीचर हे आहे की, कायदेशीररित्या ई-कॉमर्स कंपनी केवळ मार्केटप्लेस म्हणून काम करते. ई-कॉमर्स कंपन्यांसाठी भारतात अनेक शक्यता आहेत. 1.3 अब्ज लोकांच्या या देशात केवळ 6 टक्के लोकांकडे क्रेडिट कार्ड आहे. त्यात दरवर्षी 25 टक्के वाढ होत आहे. भारतात 4.8 कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. त्यात सुध्दा दरवर्षी 25 टक्के वाढ होत आहे.

  पुढे वाचा...

 • amazon India is worth more than rs 1 lakh crore

  भारतासाठी जेफ बेजोस यांचे इरादे


  - सध्यस्थितीत फ्लिपकार्ट आणि त्यांची सब्‍सि‍डयरी मिंत्रा 7.5 अब्ज डॉलरचा वार्षिक जीएमवी प्राप्त करत आहे. वॉलमार्टच्या 16 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीमुळे कंपनी वेगाने वाढत आहे. कंपनी ग्रोसरी सेक्टरचा विस्तार करत आहे. अमेझॉन इंडिया 5 अब्ज डॉलर जीएमवीसोबत दुसऱ्या नंबरवर आहे. याचाच अर्थ अमेझॉनला अग्रेसिव्ह होण्याची गरज आहे. सीईओ जेफ बेजोस यांचाही तोच इरादा आहे. 

Trending