Home | Business | Industries | Amritsar tour package starts with rs2500

2,500 रुपयात बघा वाघा बॉर्डर, सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग; असे करा प्लॅनिंग

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 04, 2018, 10:06 AM IST

उन्हाळ्याच्या सुट्टीत अमृतसर पाहणे हा एक चांगला ऑप्शन आहे. येथे तुम्ही प्रसिध्द सुवर्णमंदिर, वाघा बॉर्डर, जा

 • Amritsar tour package starts with rs2500
  2500 रुपयात तुम्ही सुवर्णमंदिर, वाघा मंदिर, जालियनवाला बाग तुम्ही बघू शकता.

  नवी दिल्ली- उन्हाळ्याच्या सुट्टीत अमृतसर पाहणे हा एक चांगला ऑप्शन आहे. येथे तुम्ही प्रसिध्द सुवर्णमंदिर, वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग बघू शकता. याशिवाय पंजाबमधील खाद्यपदार्थांचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. अमृतसर फिरण्यासाठी टूर ऑपरेटरच्या सोबत तुम्हीही बुकिंग करु शकता. स्वत: बुकिंग केल्यास अमृतसरमध्ये तुम्हाला बजेट हॉटेलचे बरेच ऑप्शन भेटू शकतात. त्यामुळे अवघ्या 2500-3000 रुपयात तुम्ही फिरून येऊ शकता. तर टूर ऑपरेटरच्या माध्यमातून गेल्यास तुम्हाला 5500 रूपयांचा खर्च येईल.

  स्वत: पॅकेज बनवत असाल तर हे आहेत ऑप्शन


  कसे जाल अमृतसरला- तुम्ही अमृतसरला महामार्गाने, रेल्वेने आणि फ्लाईटने जाऊ शकता. दिल्लीहूनही तुम्ही अमृतसरला या माध्यमातून जाऊ शकता.

  रोड- तुम्ही गाडीने दिल्लीहून अमृतसरला जाऊ शकता हे अंतर 453 किलोमीटर आहे. कारने गेल्यास तुम्हाला 8 तासाचा वेळ लागू शकतो.

  बस- दिल्लीहून अमृतसरला तुम्ही बसनेही जाऊ शकता. दिल्लीहून अमृतसरला जाण्यासाठी बसने तुम्हाला 380 ते 1,100 रुपये लागतील. हा एका व्यक्तीचा खर्च आहे. बसचा भाडे हे एसी, नॉन एसी आणि स्लीपरनूसार बदलू शकते.

  ट्रेन- दिल्लीहून अमृतसरला तुम्ही रेल्वेनेही जाऊ शकता. अमृतसर स्थानकापासून सुवर्णमंदिर हे दोन किलोमीटर अंतरावर आहे. दिल्लीहून अमृतसरला थर्ड एसीचे तिकीट 710 रुपये आहे.

  फ्लाईट- दिल्लीहून अमृतसरला फ्लाईटचे तिकीट 1,500 ते 1,800 रुपये आहे.

  हॉटेल- अमृतसरमध्ये बजेट आणि लक्झरी हॉटेल 568 रुपये आणि 5,000 रुपयांदरम्यान मिळू शकते. येथे 5,000 रुपयात रेडिसन ब्ल्यू आणि हयात हॉटेल भेटू शकते.

  पुढे वाचा...

 • Amritsar tour package starts with rs2500
 • Amritsar tour package starts with rs2500

  असे बुक करू शकता टूर पॅकेज

   

  लहान टूर पॅकेजचा ऑप्शन

   

  मोठ्या टूर ऑपरेटर सोबतच लहान टूर ऑपरेटरही अमृतसरचा टूर प्लॅन देत आहेत. जे मोठ्या टूर ऑपरेटर्स तुलनेत अतिशय स्वस्त आहेत. त्यामुळे तुम्ही या ऑप्शनचाही विचार करु शकता. गूगलवर अमृतसर टूर पॅकेज सर्च केल्यावर तुम्हाला अनेक ट्रॅव्हल एजंटचे ऑप्शन मिळतील. ते दिल्लीहून 4,550 रुपयांपासून 6,000 रुपयात टूर पॅकेज ऑफर करत आहेत. येथे तुम्ही तुमच्या बजेटनुसार टूर पॅकेज घेऊ शकता. पण हे टूर पॅकेज घेण्यापूर्वी एजंटचे सर्टिफिकेशन जरूर चेक करा.

   

   

   

Trending