Home | Business | Industries | apple big win over samsung court imposes penalty of rs 3600 crore for design theft

अॅपलच्या पेटंट खटल्यात सॅमसंगचा पराभव

वृत्तसंस्था | Update - May 26, 2018, 01:39 AM IST

सॅमसंग आणि आयफोन निर्माता कंपनी अॅपल यांच्या दरम्यान मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात अखेर अॅपलचा विजय झाला आ

  • apple big win over samsung court imposes penalty of rs 3600 crore for design theft

    कॅलिफोर्निया - सॅमसंग आणि आयफोन निर्माता कंपनी अॅपल यांच्या दरम्यान मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात अखेर अॅपलचा विजय झाला आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने आयफोन आणि टॅब्लेटची डिझाइन कॉपी करण्याच्या प्रकरणात सॅमसंग दोषी असल्याचा निर्वाळा दिला आहे. न्यायालयाने सॅमसंगला अॅपलला ५३.९ कोटी डॉलर (सुमारे ३,६०० कोटी रुपये) देण्याचे आदेश दिले आहेत.

    सॅमसंगने आय फोनच्या डिझाइन आणि युटिलिटी पेटंटचे उल्लंघन केले असल्याचा आरोप अॅपलने लावला होता. अॅपल आणि सॅमसंग यांच्या दरम्यान पेटंटची ही लढाई २०११ मध्ये सुरू झाली होती. अॅपलने कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात सॅमसंगविरोधात खटला दाखल केला होता. २०१२ च्या सुरुवातीच्या निकालात सॅमसंगला जबाबदार धरून अॅपलला १.०५ अब्ज डॉलर देण्याचे आदेश देण्यात आले होते. वास्तविक नंतर यामध्ये दंडाची रक्कम कमी करण्यात आली होती. मात्र, हा वाद कायम राहिला. अमेरिकेत पेटंट कायद्याचे उल्लंघन केल्यास कंपनीच्या उत्पादनाच्या एकूण उत्पन्नातील काही भाग दंड म्हणून द्यावा लागतो.


    बिघाडाबाबत माहिती, तरी विक्री

    आयफोन-६, ६ प्लस मागील मॉडेलप्रमाणे बेंड होणार नसल्याचे अॅपलने आधी सांगितले होते. मात्र, हे फोनदेखील बेंड होणार असल्याची माहिती असूनही कंपनीने फोनची विक्री केली. हा दावा काही मीडिया अहवालांत करण्यात आला आहे. अॅपल इनसायडरच्या एका अहवालानुसार, “टच डिजीज’संबंधी दाखल करण्यात आलेल्या खटल्यातून समोर आलेल्या कागदपत्रांवरून असे लक्षात येते की, अॅपलला आयफोन-६ आणि ६-प्लस फोनमधील बिघाडाबाबत आधीपासूनच माहिती होती.

  • apple big win over samsung court imposes penalty of rs 3600 crore for design theft

Trending