Home | Business | Industries | avengers infinity warmints 120 crore in opening weekend

भारतात 'अवेंजर्स: इनफिनिटी वॉर'ची धूम, 3 दिवसात कमावले 120 कोटी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 01, 2018, 12:00 AM IST

मारवल स्टुडिओचा सगळ्यात मोठा सुपरहिरो चित्रपट 'अवेंजर्स: इनफिनिटी वॉर'ची भारतात धूम आहे. या हॉलीवुड चित्रपटाने 2

 • avengers infinity warmints 120 crore in opening weekend
  'अवेंजर्स: इनफिनिटी वॉर' भारतात 27 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. (सांकेतिक फोटो)

  मुंबई- मारवल स्टुडिओचा सगळ्यात मोठा सुपरहिरो चित्रपट 'अवेंजर्स: इनफिनिटी वॉर'ची भारतात धूम आहे. या हॉलीवुड चित्रपटाने 2018 मध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. सोमवारी कंपनीचे ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन 120.09 कोटी होते. या सोबतचा हा चित्रपट भारतात सगळ्यात मोठी ओपनिंग करणारा हॉलीवुड चित्रपट झाला आहे. या चित्रपटात सर्वाधिक सुपरहिरो आहेत जे सुपरव्हिलनच्या विरोधात युध्द करतात.

  डिस्ने इंडियाचे प्रमुख (स्टुडिओ एंटरटेनमेंट) विक्रम दुग्गलने म्हणाले की, 'अवेंजर्स: इनफिनिटी वॉर'चा पहिला आठवडा हा सिनेजगतासाठी मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाने भारतात असलेल्या सिनेरसिकांमध्ये मारवलच्या पॉप कल्चरची ब्रँन्ड इमेज स्ट्रॉग झाली आहे.

  27 एप्रिलला झाला होता भारतात रिलीज
  'अवेंजर्स: इनफिनिटी वॉर' भारतात 27 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन 94.03 कोटी रुपये होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक जॉय आणि अॅन्थोनी रूसो आहेत. बॉक्‍स ऑफिसवर पहिल्या दिवशी 40.13 कोटी, दुसऱ्या दिवशी 39.1 कोटी आणि रविवारी 41.67 कोटी रुपये कमाई झाली.

  पुढील स्लाईडवर आणखी काही माहिती

 • avengers infinity warmints 120 crore in opening weekend
  चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 40.13 कोटी रुपये कमावले आहेत.

Trending