Home | Business | Industries | buy sonam kapoor lahanga from these retail market

खरेदी करा सोनम, ऐश्वर्यासारखा लेहंगा स्वस्तात, हे आहेत 6 बेस्ट मार्केट ऑप्शन

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 17, 2018, 01:29 PM IST

मुंबईतील क्रॉफोर्ड मार्केट हे पोलिस मुख्यालय आणि सीएसटी स्टेशनजवळ आहे. हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे होलसेल मार्केट आहे

 • buy sonam kapoor lahanga from these retail market
  जर खरेदी करायचा असेल सोनम आणि ऐश्वर्यासारखा लेहंगा तर हे आहेत बेस्ट मार्केट प्लेस.

  नवी दिल्ली- तुम्ही सोनम कपूरने मेंदीपासून लग्नापर्यंत परिधान केलेल्या लेहंग्याची आणि ऐश्वर्याने कान फिल्म फेस्टिव्हमध्ये घातलेल्या गाऊनची चर्चा ऐकली असेल. सध्या लग्नसराई सुरु आहे आणि तुम्हाला लग्नासाठी लेहंगा किंवा गाउन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला आम्ही असे काही मार्केट ऑप्शनस सांगत आहोत तेथे तुम्ही ते 40 टक्के कमी किंमतीत खरेदी करु शकता.

  क्रॉफोर्ड आणि झवेरी मार्केट, मुंबई

  मुंबईतील क्रॉफोर्ड मार्केट हे पोलिस मुख्यालय आणि सीएसटी स्टेशनजवळ आहे. हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे होलसेल मार्केट आहे. या बाजारात खास करुन भाजी आणि फुले मिळतात. येथे स्टिच केलेले कपडे, ड्रेस मटेरियल, आर्टिफिशियल दागिने, ट्रॅव्हल बॅग असे सामान मिळते.

  सुरतचे टेक्सटाईल आणि डायमंड मार्केट, गुजरात
  - गुजरातमधील टेक्सटाईल आणि डायमंड मार्केट पुर्ण भारतात अतिशय लोकप्रिय आहे. यात भारतातील 800 जास्त होलसेलर्स आहेत. जे टेक्सटाईल बिझनेसशी निगडित आहेत. येथे देशभरातील व्यापारी दिवाळी आणि लग्नाच्या खरेदीसाठी येतात. देशात जवळपास 42 हजारहून अधिक पॉवरलूम युनिट्स आहेत आणि प्रिटिंग मिल्स आहेत. या मिल्स दरवर्षी नऊ कोटी साड्या आणि ड्रेस मटेरियल तयार करतात. येथील साड्या देशभरात फेमस आहेत. सुरतमधील मिलेनियम मार्केटमधून तुम्ही कमी किंमतीत साड्या खरेदी करु शकता.


  पुढे वाचा: लग्नाच्या शॉपिंगसाठी आणखी काही बेस्ट मार्केट प्लेस ऑप्शन...

 • buy sonam kapoor lahanga from these retail market
  ब्रायडल वेअर

  चांदणी चौक, दिल्ली 
  जुन्या दिल्लीतील चांदणी चौक बाजारात लग्नाचे सामान खरेदी करण्यासाठी ग्राहकांशिवाय रिटेल व्यापारी येतात. उत्तर भारतातील सर्व राज्यांमध्ये हे सामान सप्लाय केले जाते. नई सडक या ठिकाणी तुम्हाला लग्नाच्या साडया आणि लेहंगा मिळेल. येथील किंमती रिटेल बाजाराच्या तुलनेत 40 टक्के कमी असतात. येथे तुम्हाला मनिष मल्होत्रा, रितु कुमार, तरूण ताहिलयानी या डिझायनरचे कॉपी केलेले लेहंगे अतिशय स्वस्त किंमतीत मिळतील. येथे जवळपास एक हजार दुकाने ही केवळ लग्नाशी निगडित वस्तूंची आहेत.

   

   

  करोल बाग, दिल्ली
  कपड्याच्या शॉपिंगमध्ये करोल बाग मार्केट हे नाव नेहमीच आघाडीवर असते. येथे कपड्यांची एक हजाराहून अधिक दुकाने आहेत. येथे कपडे स्वस्तात मिळतात. येथे लेहंगा, साडी सूट या सगळ्या वस्तू मिळतात असे स्थानिक दुकानदाराने सांगितले. येथील कलेक्शन हे लेटेस्ट फॅशननुसार असते. येथे लग्नाचे कपडे 20 ते 25 टक्के कमी किंमतीत मिळतात.

   

   

  पुढे वाचा: लग्नाच्या शॉपिंगसाठी आणखी कुठे जाऊ शकता...

 • buy sonam kapoor lahanga from these retail market

  जोहरी बाजार, जयपूर
  लग्नाच्या शॉपिंगसाठी राजस्थानचे जोहरी बाजार हे एक मोठे केंद्र आहे. जयपूरचा जोहरी बाजार हा दिल्लीतील चांदणी चौकासारखा आहे. अतिशय अरुंद गल्ल्यांमध्ये हा बाजार असून येथे मोठी गर्दी असते. येथे सोने, चांदी, मोती, हिऱ्याचे दागिने मिळतात. याशिवाय लग्न आणि स्वागत समारंभासाठी लेहंगा, साडी, सूट, गाउन मिळतात. हा बाजार कुंदन दागिन्यांसाठीही फेमस आहे. या बाजारातील किंमती रिटेलच्या तुलनेने 40 टक्क्यांनी कमी आहेत.

   

Trending