Home | Business | Industries | ebay to sell stake in flipkart for about usd 1 billion

फ्लिपकार्टमधील आपला हिस्सा विकून eBay बाहेर पडणार, नव्याने लॉन्चिंग

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 10, 2018, 01:46 PM IST

अमेरिकन कंपनी eBay फ्लिपकार्ट-वॉलमार्टच्या डीलनंतर आता आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. eBay ची जवळपास 1.

 • ebay to sell stake in flipkart for about usd 1 billion

  नवी दिल्ली- अमेरिकन कंपनी eBay फ्लिपकार्ट-वॉलमार्टच्या डीलनंतर आता आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. eBay ची जवळपास 1.1 अब्ज डॉलरची हिस्सेदारी आहे. eBay चा इरादा नव्याने कंपनी लॉन्च करुन क्रॉस बॉर्डर ट्रेडवर फोकस करण्याचा आहे. फ्लिपकार्टने जवळपास एक वर्षापुर्वी eBay.in चे अधिग्रहण केले होते.

  eBay ने जारी केले स्‍टेटमेंट
  फ्लिपकार्ट-वॉलमार्टच्या डीलनंतर eBay ने एक वक्तव्य जारी करत दोन्ही कंपन्यांना सांगितले आहे की, ते आपले शेअर्स विकणार आहेत. ही हिस्सेदारी जवळपास 1.1 अब्ज डॉलरची आहे. eBay चे म्हणणे आहे की ते फ्लिपकार्टसोबत आपली स्ट्रॅटजिक रिलेशनशिप पुढे सुरु ठेवणार नाहीत. त्यामुळे ते आपले कमर्शियल अॅग्रीमेंट संपविणार आहेत. फ्लिपकोर्टसोबत eBay.in आपले लायसनही टर्मिनेट करणार आहे.

  नव्याने लॉन्च करणार कंपनी
  - कंपनीचे म्हणणे आहे की, eBay India नव्या पध्दतीने लॉन्च करण्याची तयारी करण्यात येत आहे. या कंपनीचा मुख्य फोकस हा क्रॉस बॉर्डर ट्रेडवर असेल. आमच्यासाठी ही मोठी संधी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. eBay चे म्हणणे आहे की भारत ही ई कॉमर्सची मोठी बाजारपेठ आहे. त्यात सातत्याने वाढ होत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या बाजारात अनेक कंपन्या एकाच वेळी काम करु शकतात.

Trending