Home | Business | Industries | every third online shopper received fake products

ऑनलाईन शॉपिग करताना राहा सावधान; नकली वस्तूंची होत आहे विक्री, सर्वेचा खुलासा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 24, 2018, 11:12 AM IST

काही ई-कॉमर्स कंपन्यांकडून नकली विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ग्राहकांची आवड आणि ई-कॉमर्स साइट्सक

 • every third online shopper received fake products

  नवी दिल्ली- काही ई-कॉमर्स कंपन्यांकडून नकली विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ग्राहकांची आवड आणि ई-कॉमर्स साइट्सकडून मिळणारे हेवी डिस्काउंटस यामुळे हे प्रोडक्ट्स विकले जात आहेत. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, लोकांचे ध्यान आकर्षिक करण्यासाठी सेलर्स या साइट्सवर नकली प्रोडक्‍ट्स हेवी डिस्काउंटसह लिस्ट करतात. अनेक कंपन्या डिस्काउंटच्या या भुलभुलैय्यात सापडतात आणि सेलर्सची कोणतीही तपासणी करत नाहीत. लोकल सर्कि‍ल्‍सने या प्रकरणी ग्राहकांचे विचार जाणून घेण्यासाठी 12 हजार यूनिक ग्राहकांचा सर्वे केला आहे.


  सर्वेत लोकांनी काय सांगितले?
  पहिल्या पोलमध्ये 6,923 लोकांनी म्हणजेच 38 टक्के ग्राहकांनी सांगितले की, मागील एक वर्षात ई-कॉमर्स साइटवरुन नकली प्रोडक्‍ट मिळाले आहेत. 45 टक्के लोकांनी सांगितले की आमच्यासोबत असे काही घडले नाही तर 17 टक्के लोकांनी सांगितले की, असे काही घडले असले तरी आम्हाला काही माहिती नाही. तर मार्केट रि‍सर्च प्‍लॅटफॉर्म वेलोसि‍टी एमआरद्वारा करण्यात आलेल्या दुसऱ्या सर्वेत आढळले की मागील सहा महिन्यात ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला नकली प्रोडक्‍ट् मिळाले आहे. या सर्वेत 3,000 लोकांना सामिल करण्यात आले होते.

  कोणत्या कंपनीकडून अधिक बनावट प्रोडक्‍टची विक्री
  लोकांना विचारण्यात आले की कोणत्या ई-कॉमर्स कंपनीने मागील एक वर्षात नकली प्रोडक्‍ट विकले. याचे उत्तर देताना 12 टक्के जणांनी स्नॅपडील, 11 टक्के जणांनी अॅमेझॉन आणि 6 टक्के जणांनी फ्लि‍पकार्टवरुन आपल्या नकली प्रोडक्‍ट मिळाल्याची तक्रार केली आहे. 71 टक्के लोकांनी सांगितले की ते ऑनलाइन शॉपिंग करत आहेत आणि त्यांना नकली प्रोडक्‍ट मिळालेले नाहीत.

  कोणत्या कॅटेगिरीत सगळ्यात जास्त नकली सामान
  सर्वेत सांगण्यात आले आहे की, नकली प्रोडक्‍ट्सच्या कॅटेगिरीत सगळ्यात वरती परफ्यूम आणि दूसऱ्या क्रमांकावर फ्रेंगनेंस आहे. त्यानंतर शूज आणि खेळाचे साहित्य आहे. तर 51 टक्के लोकांनी सांगितले की फॅशन, अपैरल, बॅग्स, गॅजेट्स या दुसऱ्या कॅटिगरीत नकली सामान मिळत आहे. 2014 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एका सेलरवर बंदी घातली होती तो शॉपक्‍लूज.कॉमवर आपले प्रॉडक्ट L'Oreal नावाने विकत होता. तर अमेरिकेच्या लाइफस्‍टाइल आणि फुटवेअर ब्रॅण्ड Skechers ने फ्लि‍पकार्ट आणि चार सेलर्सवर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन नकली वस्तू विकल्या जात असल्याचा केला होता.

Trending