Home | Business | Industries | facebook starts rolling out downvote button

फेसबुकने सुरू केले 'डाउनवोट'चे बटन, डि‍सलाईकपेक्षा वेगळे आहे हे फीचर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 30, 2018, 01:10 PM IST

फेसबुकवर लाईकच्या पध्दतीने डिसलाईकच्या बटनाची वाट पाहणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. फेसबुकने डिसलाईकच्या जागी डाउ

  • facebook starts rolling out downvote button

    नवी दिल्ली- फेसबुकवर लाईकच्या पध्दतीने डिसलाईकच्या बटनाची वाट पाहणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. फेसबुकने डिसलाईकच्या जागी डाउनवोटचे फीचर सुरु केले आहे. कंपनीच्या वतीने हे डिसलाईकचे बटन नसल्याचे याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पण आता तुम्ही सोशल साईटवर तुमची नापसंती दर्शवू शकता.

    फेसबूकच्या म्हणण्यानुसार, डाऊनवोट करुन तुम्ही हे सांगू शकता की हे योग्य नाही ही पोस्ट किंवा कमेंट भ्रमित करणारी आहे. कंपनीने फेब्रुवारी महिन्यात मर्यादित लोकांसोबत अमेरिकेत हे फीचर सुरु केले होते. कंपनीने आता हे फीचर अधिक लोकांसाठी सुरु केले आहे. याचा मुख्य उद्देश स्टेटस आणि कमेंटचा दर्जा सुधारणे हा आहे. फेसबुकने 2009 मध्ये लाईकचे बटन सुरु केले. त्यानंतर लोकांची अपेक्षा होती की लाईकप्रमाणे डिसलाईकचेही बटन असावे.

    फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्ही असा मजकूर नियंत्रित करणार आहोत जो खोटी माहिती पसरवत आहे. आम्ही अशा कटेंटचा रीच कमी करणार आहोत. आम्हाला समाजात चुकीचे संदेश पसरू नयेत, असे वाटते.

Trending