Home | Business | Industries | failure story of videocon promoter venugopal dhoot is similar as anil ambanis rcom

Anil Ambani नी केली होती जी चूक, तीच केली या व्यावसायिकाने

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 10, 2018, 12:58 PM IST

व्हिडीओकॉन हा एक जगविख्यात ब्रॅन्ड आहे. 90 च्या दशकात भारतातील ज्या घरात टीव्ही आहे त्या घरात टीव्ही घेताना

 • failure story of videocon promoter venugopal dhoot is similar as anil ambanis rcom

  नवी दिल्ली- व्हिडीओकॉन हा एक जगविख्यात ब्रॅन्ड आहे. 90 च्या दशकात भारतातील ज्या घरात टीव्ही आहे त्या घरात टीव्ही घेताना व्हिडीओकॉनचाच विचार प्रथम केला जायचा. आज ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे. स्वस्त दरात उत्तम दर्जाचे टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी यामुळे ही कंपनी भारतीय मध्यमवर्गीयांची आवडती होती. या कंपनीवर आयसीआयसीआय, एसबीआयसह अन्य बॅंकांचे 48,000 रुपयांचे कर्ज आहे.

  देशातील टॉप इलेक्ट्रॉनिक ब्रॅन्ड असणाऱ्या व्हिडीओकॉनचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांच्या अपयशाची गाथा ही काही प्रमाणात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहाच्या अपयशाशी मिळती-जुळती आहे. हे दोन्ही व्यावसायिक आपल्या कंपन्यांना पुढे नेण्यात अपयशी ठरले. आपण जाणून घेऊ यात त्यांच्या अपयशाची कारणे आणि ते अपयशी का झाले ते.

  आरकॉम आणि व्हिडीओकॉनचे अपयश
  व्हिडीओकॉनचे प्रमोटर वेणुगोपाल धूत आणि अनिल अंबानी यांच्या कंपन्या एकेकाळी भारतीयांच्या मनावर राज्य करत होत्या. अंबानी यांची आरकॉम ही देशातील दुसरी मोठी टेलीकॉम कंपनी होती. 2010 पर्यंत आरकॉमचा मार्केट शेअर टेलिकॉम इंडस्ट्रीत 17 टक्के होता. काळ पुढे जात राहिला आणि या कंपन्यांवर कर्जाचा बोजाही वाढत गेला. त्यामुळे या कंपन्या विक्रीच्या उंबरठ्यावर आल्या.

  व्हिडीओकॉनला 2007 मध्ये डेट फ्री कंपनी म्हटले जात होते. ती सातत्याने नफ्यात होती. सप्टेंबर 2008 पर्यंत सातत्याने 3 आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 800 कोटी रुपये होता. त्यानंतर कंपनीचा वाईट काळ सुरु झाला. 2010-11 पर्यंत कंपनीचे कर्ज 12500 कोटी रुपये झाले. आर्थिक वर्ष 2017 मध्ये समुहाच्या सगळ्या कंपन्यांवर निव्वळ कर्ज 40 हजार कोटी रुपये झाले. आर्थिक वर्ष 2018 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 1300 कोटी रुपयांचा तोटा झाला.

  काय केल्या चुका
  अनिल अंबानी आणि वेणुगोपाल धूत यांनी केलेल्या चुका एकसमान होत्या. दोघांनी मुख्य किंवा कोर व्यवसाय सोडून नव्या बिझनेसवर डाव लावला. रिलायन्सने एनर्जी, इन्फ्रा सारख्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली. तर व्हिडीओकॉनने मोबाईल फोन, DTH, टेलिकम्युनिकेशन आणि पेट्रोलियमसारख्या क्षेत्रात विस्तार केला. या कंपन्यांनी हा सगळा विस्तार अवघ्या 2 ते 3 वर्षात केला. वाढत्या कर्जामुळे या कंपन्यांना स्थिर होण्याचा कालावधी मिळाला नाही.


  दोघांची वाटचाल एकसमान
  दोन्ही कंपन्यांची वाटचालही एकसमान सुरु आहे. व्हिडीओकॉन इन्‍सॉल्‍वेंसीत जात आहे. तर कोर्टाच्या बाहेर तडजोड सुरु असल्याने आरकॉम सध्यातरी दिवाळखोरीपासून वाचली आहे. पण कंपनीने आपला टेलिकम्युनिकेशन बिझनेस आणि टॉवर मुकेश अंबानी यांच्या जिओला विकण्याची तयारी केली आहे. समुहावरील कर्ज कमी कऱण्यासाठी अनिल अंबानी यांना आपला इंफ्रा आणि पॉवरशी निगडित बिझनेस अदानी समूहाला विकला आहे.

Trending