Home | Business | Industries | housing prices down by avg 7 pct in Jan mar 2018

मुंबई, पुण्यासह 9 शहरांमध्ये घराच्या किंमती घसरल्या; या शहरांचाही समावेश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 20, 2018, 10:00 AM IST

देशातील 9 प्रमुख शहरांमधील घराच्या किंमती 7 टक्क्यांनी घसरल्या आहेत. हा दावा रिअल इस्टेट रिसर्च अॅण्ड अॅनालि

 • housing prices down by avg 7 pct in Jan mar 2018

  नवी दिल्ली- देशातील 9 प्रमुख शहरांमधील घराच्या किंमती 7 टक्क्यांनी घसरल्या आहेत. हा दावा रिअल इस्टेट रिसर्च अॅण्ड अॅनालिस्ट फर्म प्रॉपइक्विटीद्वारे जारी करण्यात आलेल्या एका अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरातील बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी आपल्या मालमत्तांचे दर कमी केले आहेत. विक्री वाढविण्यासाठी ते अनेक उपाय करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

  आकडेवारी काय सांगते?
  2018 च्या पहिल्या तिमाहीत न विक्री होणाऱ्या घरांची संख्या 2 टक्क्यांनी कमी होऊन 5,95,074 इतकी झाली आहे. ती मागील तिमाहीत 6,08,949 इतकी होती. याद्वारे समजु शकते की किमती कमी झाल्याने घराची विक्री वाढली आहे. अहवालानुसार घराची विक्री 8 टक्क्याने वाढून 2018 च्या पहिल्या तिमाहीत 40,694 घरांची विक्री झाली. तर ऑक्टोबर ते डिसेंबर 2017 च्या शेवटच्या तिमाहीत 37,555 घरांची विक्री झाली. अहवालात 9 शहरांचा आकडा देण्यात आला आहे. यात गुडगांव, नॉयडा, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरु, ठाणे, कोलकाता, चेन्नई या शहरांचा समावेश आहे.

  7 टक्क्यांनी किंमती घसरल्या
  - प्रॉप इक्विटीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की डेव्हलपर्सने घराच्या किंमती 7 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. या तिमाहीत सरासरी किंमत 6,260 रुपये प्रति वर्ग फुट आहे. तर 2017 च्या शेवटच्या तिमाहीत ही किंमत 6,762 रुपये प्रति वर्ग फुट होती.

  मध्यम वर्गावर आणि पंतप्रधान आवास योजनेवर लक्ष

  प्रॉप इक्‍वि‍टीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर जसूजा म्हणाले की, पहिल्या तिमाहीनंतर विकसक आपले सगळे लक्ष मध्यम आकाराच्या परवडणाऱ्या घरावर केंद्रित करतील, अशी अपेक्षा आहे. कारण या प्रवर्गात पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्याची इच्छा असणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ते आता किंमती कमी करुन तयार असलेल्या घरांची विक्री करत आहेत.

  6 शहरांमध्ये विक्री वाढली तर 3 शहरांमध्ये घटली
  2018 च्या जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत बंगळुरुमध्ये हाउसिंग सेलमध्ये 45 टक्क्यांनी वाढ झाली आणि 8,349 यूनि‍टची विक्री झाली. तर चेन्नईत 71 टक्क्यांनी वाढ होऊन 3,101 यूनि‍टची विक्री झाली. याशिवाय मुंबईत 12 टक्क्यांनी तर पुण्यात 16 टक्क्यांनी घराची विक्री वाढली. पुण्यात 8,509 यूनि‍टची विक्री झाली.

  या शहरांमध्ये विक्रीत घट
  हैदराबाद आणि ठाणे शहरांमध्ये घरांच्या विक्रीत घट झाली. हैदराबादमध्ये घरांची विक्री 11 टक्क्यांनी कमी झाली. तेथे 2,631 यूनिटची विक्री झाली. ठाण्यात 6 टक्क्यांनी विक्री घटली. तिथे 9,249 यूनि‍टची विक्री झाली. गुडगांवमध्ये घराची विक्री 60 टक्क्यांनी घसरली आणि केवळ 1,007 युनि‍टची विक्री झाली.


Trending