आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोनची चार्जिग केबल घेताना लक्षात ठेवा या 4 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्मार्टफोनची चार्जिग केबल खराब होणे ही अतिशय सामान्य बाब आहे. याची अनेक कारणे असू शकतात. USB केबल कापली जाणे, जास्त ओढल्याने आतून डॅमेज होणे, कनेक्टर क्षतिग्रस्‍त होणे ही ती कारणे असू शकतात. त्यामुळे ही केबल खराब होते. असे घडल्यावर आपण लगेच बाजारातून दूसरी केबल खरेदी करतो. पण लोकांची एक तक्रार असते ती म्हणजे जशी USB केबल कंपनीच्या फोनसोबत मिळते तशी केबल बाजारात मिळत नाही. पण त्याचे खरे कारण बाजारातून खरेदी केलेली केबल योग्यरित्या परफॉर्म करु शकत नाही, हे असते. 

बाजारातून खरेदी केलेली केबल डाटा ट्रान्सफर आणि चार्जिगची ती क्षमता दाखवत नाही जी कंपनीची केबल दाखवते. तुम्हाला कंपनीने दिलेला अॅडोप्टर वापरला तरी सुध्दा ही केबल लवकर खराबही होते. आम्ही तुम्हाला काही पॅरामीटर सांगणार आहोत, जे केबलला बेस्ट बनवतात. कंपनीच्या दर्जाची केबल बाजारात मिळू शकते की नाही. यामागे काय तंत्रज्ञान आहे याविषयी आम्ही टेक एक्सपर्ट विकास खिरवडकर यांच्याशी आम्ही चर्चा केली.

 

 

अॅडॉप्टर, चार्जर आणि बॅटरीचे योग्य कॉम्बिनेशन समजून घ्या
विकास यांच्या मते, कंपनीकडून जो चार्जिग अॅडोप्टर आणि केबल मिळते ती स्मार्टफोनच्या बॅटरीच्या हिशोबाने मिळते. म्हणजे स्मार्टफोनची बॅटरी जास्त mAh ची आहे तर अॅडोप्टर आणि चार्जरची पॉवरही त्या हिशोबाने ठेवण्यात येते. केबल खराब झाली तरी अॅडोप्टर कंपनीचाच वापरावा. एक चांगली केबल बाजारातून खरेदी करावी. त्यासाठी तुम्हाला 4 पॉईंट पाहण्याची गरज आहे.  

 

 

जास्त व्होल्ट म्हणजे जास्त वेगाने चार्जिग
विकास यांच्या मते, वीजेचा साधा सिध्दांत आहे, जी केबल जितक्या वेगाने वीज हस्तांतरण करेल ती तुमच्या फोनला तितक्याच वेगाने चार्ज करेल. सर्वसाधारणपणे याला व्होल्टने मोजतात. तुमची केबल आणि स्मार्टफोन फास्‍ट चार्जिंग टेक्‍नोलॉजीद्वारे जितक्या जास्त व्होल्ट क्षमतेने वीजेचे हस्तांतरण करेल तितक्या वेगाने तुमचा फोन चार्ज होईल. व्होल्टचे स्पेसिफिकेशन अॅडोप्टरवर लिहिलेले असते. त्यामुळे अॅडोप्टर जितक्या व्होल्टचा असेल तितक्याच व्होल्टची केबल घ्यावी.

 

 

तारांची भूमिका समजून घ्या
सर्वसाधारणपणे कोणतीही चार्जिग केबल 4 तारांनी मिळून बनते. त्यांचा रंग लाल, पांढरा, काळा आणि लाल असतो. या पांढरी आणि हिरवी तार ही डाटा ट्रान्सफरसाठी असते. तर उरलेली काळी आणि लाल तार इलेक्ट्रिक ट्रान्सफरसाठी असते. सर्वसाधारणपणे या दोन्ही तारा 5 व्हॉल्ट क्षमतेच्या असतात.

 

 

गेजचे गणित
विकास यांच्या मते, एक स्टॅण्डर्ड चार्जर केबल 28 गेजची असते. ती 0.5A (अॅम्पियर) क्षमतेची असते. हा कुठल्याही केबलचा स्टॅण्डर्ड रेट आहे. जर तुम्हाला फास्ट केबल हवी असेल तर केबलची इंटरनल वायर 24 गेजची असावी. ही वायर 5 व्हॉल्ट क्षमतेसोबत 2A पेक्षा जास्त कॅपेसिटी देते. थोडक्यात तुमच्या केबलची तार जितकी जाड असेल तितक्याच वेगाने तुमचा फोन फास्ट चार्ज होईल.

 

 

लहान केबलच उत्तम
केबल ही जास्त लांबीची न घेता योग्य लांबीची घ्या. कारण जेवढी केबल लांब तेवढा वीजेचा अपव्यय जास्त होण्याची शक्यता अधिक असते. 

 

 

कॉपरची केबल खरेदी करा
विकास यांच्या मते, स्वस्त केबल न घेता कॉपरची वायर वापरलेली केबल घ्या. कॉपर वीजेचे वहन अॅल्यूमिनियम आणि अन्य धातुपेक्षा जास्त सहज करते.

 

 

डाटा ट्रान्सफरचा स्पीड पाहा
केबल चार्जिग शिवाय डाटा ट्रान्सफरसाठीही उपयोगात येते. त्यामुळे तिची क्षमता तपासणे गरजेचे आहे. विकास यांच्या मते, 480Mbps किंवा त्याहून जास्त क्षमतेची केबल तुमच्यासाठी बेस्ट आहे.
 

बातम्या आणखी आहेत...