आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tech in gadgets: बोलून करायचे आहे टाईप, या 4 फ्री टूलचा करा वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एक काळ असा होता की तुम्ही कोणत्या कार्यालयात गेला की तुमच्या कानावर टाईपरायटरचा आवाज पडत होता. पण हा काळ मागे पडला आणि त्याची जागा संगणकाने घेतली. त्यानंतर काळ आणखी पुढे सरकारला आणि स्मार्टफोन, टॅब बाजारात आले. त्यामुळे साहजिकच की-पॅड वर टाईप करणे भाग   पडू लागले. पण आता काळ त्यांच्याही पुढे गेला आहे. आता तुम्ही फक्त बोलायचे आहे आणि आपोआप टाईप होईल. जगातील अनेक भाषांमध्ये आता बोलून टाईप करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेला Speech to Text किंवा STT असे म्हटले जाते. सुरूवातीला ही सुविधा फक्त इंग्रजी आणि अन्य परदेशी भाषांसाठी होती. पण आता या तंत्रज्ञानाचे भारतीयकरण होऊ लागले आहे. तुम्ही हिंदीही बोलून टाईप करु शकता.

 

 

हे चार टूल देतात बोलून टाईप करण्याची सूविधा
तुम्हाला बोलून हिंदी टाईप करायचे असल्यास इंटरनेटवर ही सूविधा उपलब्ध आहे. यात 4 मुख्य टूल आहेत.
Dictation.io
Hindi dictation
Google Translate
Google docs

याच्या मदतीने तुम्ही सहजच आपल्या हिंदीत टाईप करु शकता. साधारण 500 शब्द टाइप करण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात. वॉईस टायपिंगद्वारे तुम्ही हे केवळ 4 ते 5 मिनिटात करु शकता. जर इंटरनेटची स्पीड चांगली असेल तर हे टूल तेवढाच वेळ घेतात जेवढा तुम्हाला बोलण्यास लागतो.  Tech in gadgets मध्ये आपण याविषयीच जाणून घेऊ.

 

 

स्‍मार्टफोन आणि संगणकावर करु शकता टाईप
येथे आम्ही तुम्हाला ज्या व्हाईस टायपिंग टूलविषयी माहिती देत आहोत त्याच्या मदतीने संगणक, लॅपटॉप आणि स्मार्टफोन या तिन्हीवर बोलून तुम्ही टाईप करु शकता. या अॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुनही तुम्ही डाउनलोड करु शकता.

1- Dictation.io: व्हॉईस टायपिंगसाठी ही वेबसाईट सगळ्या जास्त लोकप्रिय आहे. अनेक जण व्हॉईस टायपिंगसाठी या वेबसाईटचा उपयोग करतात. याद्वारे तुम्ही अनेक भारतीय भाषांमध्ये टायपिंग करु शकता. 
2-Hindi Dictation Online: या ठिकाणी अनेक भारतीय भाषांमध्ये तुम्ही टाईप करु शकता. हिंदी तर तुम्ही सहज टाईप करु शकता.
3 - Google Docs: मायक्रोसॉफ्ट वर्डच्या धर्तीवर तयार करण्यात आलेले हे गूगलचे खास टूल आहे. याचा उपयोग संगणक किंवा मोबाईलवर ऑनलाईन करता येतो. या व्हॉईस टायपिंगचे फीचर आहे. व्हॉईस टायपिंग करुन तुम्ही ते ऑनलाईन शेअर करु शकता. गुगल डॉक्स फाईल एका डिव्हाईसवर तयार करुन तुम्ही दुसऱ्या डिव्हाईसवर सहज अॅक्सेस करु शकता. हे मोबाईल आणि संगणकावर सहज काम करु शकते. तुम्ही अॅपही डाऊनलोड करु शकता.

4- Google Translate: हे मुख्यत: भाषांतरासाठी तयार करण्यात आले आहे. याद्वारे तुम्ही एका भाषेतुन दुसऱ्या भाषेत सहज भाषांतर करु शकता. याद्वारे तुम्ही व्हॉईस टायपिंगही करु शकता. व्हॉईस टायपिंगचे बहुधा हेच पहिले टूल असावे. तुम्ही माईक आयकॉनवर क्लिक करुन 200 ते 500 शब्द बोलून व्हॉईस टायपिंग लगेच करु शकता.

 
 

बातम्या आणखी आहेत...