Home | Business | Industries | hpcl expansion plan petrol pump dealership opportunity and process

HPCL उघडणार 500 नवे पेट्रोल पंप, डीलरशिप घेण्यासाठी आहे ही प्रोसेस

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 24, 2018, 10:21 AM IST

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने पुढील वर्षी देशात 500 नवे पेट्रोल पंप उघडण्याची घोषणा केल

 • hpcl expansion plan petrol pump dealership opportunity and process

  नवी दिल्ली- हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने पुढील वर्षी देशात 500 नवे पेट्रोल पंप उघडण्याची घोषणा केली आहे. बुधवारी HPCL च्या जानेवारी ते मार्च या तिमाहीतील कंपनीच्या रिझल्टची घोषणा करण्यात आली. या दरम्यान HPCL चे मॅनेजिंग डायरेक्टर एम. के. सुराणा यांनी कंपनीच्या विस्तार योजनेची घोषणा केली.

  सुराणा यांनी म्हटले आहे की, 2017-18 या आर्थिक वर्षात HPCL ने 669 नव्या पेट्रोल पंपांना मंजूरी दिली आहे. सध्या देशात HPCL चे 15,062 रिटेल आउटलेट आहेत. आता कंपनीची योजना 2018-19 या आर्थिक वर्षात 500 आउटलेट उघडण्याची आहे. जर तुम्हालाही HPCL च्या पेट्रोलपंपाची डीलरशीप घ्यायची असेल तर कंपनीच्या वेबसाईटवर याची डिटेल प्रोसेस उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की पेट्रोल पंप सुरु करण्याची पूर्ण प्रोसेस काय आहे. यासाठी काय गरजेचे आहे.

  कोण उघडू शकतो पेट्रोल पंप
  पेट्रोल पंपाचे मालक होण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. सोबतच तुमचे वय 21 ते 55 वर्षाच्या दरम्यान असावे. तुमचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले असावे.

  जमीन असावी
  - पंप उघडण्यासाठी तुमच्याकडे जमीन असणे गरजेचे आहे. जर जमीन तुमच्या स्वत:ची नसेल तर जमीन मालकाकडून NOC घ्या.
  - तुम्ही तुमच्या कुटूंबातील कोणत्याही सदस्याची जमीन घेऊन पंपासाठी अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला NOC आणि affidavit बनवावी लागेल.
  - भाड्याने घेतलेल्या जमिनीसाठी तुमच्याकडे भाडेकरार असावा. सोबतच Registered sales deed किंवा lease deed असावी.
  - जमीन हरित पट्टयात नसावी.
  - शेतजमीन असल्यास तुम्हाला ती अकृषिक करुन घ्यावी लागेल.
  - तुमच्याकडे जमिनीची सगळी कागदपत्रे आणि नकाशा असावा.

  पेट्रोल पंप उघडण्याचा खर्च
  पेट्रोल पंप उघडण्याचा खर्च जागेवर आणि पेट्रोलियम कंपनीवर अवलंबून असतो. ग्रामीण आणि शहरी अशा दोन पध्दतीचे पेट्रोल पंप असतात. दोन्ही ठिकाणचा पेट्रोल पंप उघडण्याचा खर्च वेगवेगळा असतो. मालमत्तेचा खर्च वगळुन ग्रामीण भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी 12 लाख रुपये लागतात. तर शहरी भागात त्यासाठी 25 लाख रुपये लागतात. जागेनुसार हा खर्च वेगळा असू शकतो.

  पुढे वाचा: कसा कराल अर्ज

 • hpcl expansion plan petrol pump dealership opportunity and process

  कसा कराल अर्ज


  पेट्रोलियम कंपन्या वृत्तपत्र आणि वेबसाईटवर जाहिरात देतात की त्यांना या ठिकाणी पेट्रोलपंप उघडायचा आहे. तुमची जमीन त्या ठिकाणी असेल तर तुम्ही अर्ज करु शकाल. अर्ज करण्याचा ऑप्शन संकेतस्थळावर आहे. या बाबतची प्रोसेस तुम्ही https://www.bharatpetroleum.com/images/files/BPCL-delear-selection-guidelines-brochure.pdf या लिंकवर जाऊन पाहू शकता.

   

   

  पुढे वाचा: काय आहे प्रोसेस

 • hpcl expansion plan petrol pump dealership opportunity and process

  पुढे काय घडते...


  अर्ज केल्यानंतर तुमचे लोकेशन सिलेक्ट झाल्यावर कंपनी तुमच्याशी संपर्क करते. तुम्हाला पुढील प्रोसेससाठी बोलवते. पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पुढच्या राउंडमध्ये फेस टू फेस मुलाखत होते. त्यात निवड झाल्यावर तुम्हाला पेट्रोल पंपाचे लायसन्स मिळते.

   

Trending