Home | Business | Industries | India top 4 junk market where you can sell waste scrap

येथे भंगाराच्या भावात मिळतात जुने TV, फ्रिज, AC, लॅपटॉप

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 25, 2018, 04:19 PM IST

तुम्ही एखादी जुनी वस्तू विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासमोर ओएलएक्स आणि क्विकरचा ऑप्शन लगेच येतो. प

 • India top 4 junk market where you can sell waste scrap

  नवी दिल्ली- तुम्ही एखादी जुनी वस्तू विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासमोर ओएलएक्स आणि क्विकरचा ऑप्शन लगेच येतो. पण आपल्या देशात अनेक बाजार आहेत जेथे तुम्ही अतिशय कमी किंमतीत म्हणजेच भंगाराच्या भावात टीव्ही, फ्रिज, डेस्कटॉप, लॅपटॉप आणि इतर सामान घेऊ शकता. आम्ही तुम्हाला अशाच काही बाजारांची माहिती देणार आहोत.

  सोतीगंज, मेरठ, उत्तर प्रदेश
  उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सीता गंज मार्केटमध्ये जुन्या गाड्या आणि वाहनांचे सुटे भाग अतिशय स्वस्तात मिळतात. या बाजारात जुन्या आणि अपघातग्रस्त गाड्याही मिळतात. हा बाजार आशिया खंडातील सगळ्यात मोठा भंगार बाजार म्हणूनही ओळखला जातो. येथे तुम्ही जुन्या गाड्या आणि सुटे भागही विकु शकता. सीतागंजमध्ये 1979 च्या अॅम्बेसिडरचे ब्रेक पिस्टन, 1960 च्या महिंद्रा जीपचा क्लासिक गिअर बॉक्स, दुसऱ्या जागतिक महायुध्दातील विलिज जीपचे टायरही तुम्हाला मिळतील.

  पुढे वाचा: कोणते आहे दुसरे मार्केट...

 • India top 4 junk market where you can sell waste scrap

  रविवार बाजार, अहमदाबाद

   

  अहमदाबादचा रविवार बाजार साबरमती येथे आहे. हा बाजार 600 वर्ष जुना आहे. हा बाजार गुजरातमध्ये गुजारी बाजार नावाने फेमस आहे. येथे कपडे, बॅग, होम डेकोरसारख्या वस्तू मिळतात. येथे जुने फर्निचर ते सुई अशा वस्तू मिळतात. हा बाजार फक्त रविवारच्या दिवशीच असतो. येथे तुम्ही जुन्या वस्तू आणून दुकानदारांना विकु शकता. 

   

   

  पुढे वाचा: आणखी एका बाजाराविषयी...

 • India top 4 junk market where you can sell waste scrap

  पुदुपेत्ताई, चेन्नई


  सेंट्रल चेन्नई येथील ‘ऑटो नगर’मध्ये जुन्या कार मोडिफाई करुन पुन्हा बनविण्यात येतात. येथे हजारोच्या संख्येने दुकाने आहेत. ही दुकाने गाड्यांचे जुने पार्ट आणि कार बदलण्यासाठी फेमस आहेत. 

   

  मायापुरी जंक मार्केट
  मायापुरी हे दिल्लीतील सगळ्यात मोठे भंगार मार्केट आहे. येथे जिप्सापासून ट्रॅक्टरपर्यंत स्पेअर पार्ट मिळतात. येथे अनेक दुकाने आहेत जी जुने लोखंड आणि स्टील खरेदी करतात. 
   

Trending