Home | Business | Industries | indian billionaire goes in tirupati sidhivinayak temple

या मंदिरात जातात देशातील अब्जाधीश, अंबानी ते बिर्ला कुटूंबाचा समावेश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 29, 2018, 12:49 PM IST

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश यांचे लग्न श्लोका मेहतासोबत ठरल्यानंतर संपूर्ण अंबानी परिवार सिध्दीविनायक मंदि

 • indian billionaire goes in tirupati sidhivinayak temple

  नवी दिल्ली- मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश यांचे लग्न श्लोका मेहतासोबत ठरल्यानंतर संपूर्ण अंबानी परिवार सिध्दीविनायक मंदिरात पोहचले. देशातील मोठे कॉर्पोरेट्स बिझनेसमध्ये मास्टर असले तरी ते नियमितपणे काही मंदिरांमध्ये जात असतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत मुकेश अंबानी, अनिल अंबानी, सज्जन जिंदल, गौतम अदानी, शिव नाडर हे कोणत्या मंदिरांमध्ये जातात.

  मुकेश आणि निता अंबानी
  मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा मुलगा आकाश याचे लग्न श्लोका मेहता यांच्यासोबत ठरल्यानंतर अंबानी कुटूंब सिद्धीविनायक मंदिरात गेले होते. मुकेश अंबानी हे रिलायन्स जिओ नेटवर्क लॉन्च केल्यानंतर तिरूपती येथील व्यंकटेश्वराच्या मंदिरात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनंत आणि ईशा अंबानी हे होते. मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि ईशा अंबानी गुजरातमधील द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरातही जातात. ते वाराणसी येथील मंदिरातही जातात. मुकेश अंबानी हे नीता अंबानी यांच्या बर्थ डेच्या वेळी तेथे गेले होते.

  अनंत अंबानी - बालाजी मंदिर
  रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश आणि निता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हे धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. ते नेहमी बालाजीच्या मंदिरात जात असतात. त्यांनी तेथे पाढऱ्या हत्तीच्या मुर्त्या दान केल्या आहेत.

  पुढे वाचा: अनिल अंबानी कोणत्या मंदिरात जातात...

 • indian billionaire goes in tirupati sidhivinayak temple

  अनिल आणि जय अनमोल अंबानी
  रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे आपला मुलगा जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी सोबत उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेले होते. ते आपल्या 51 व्या जन्मदिनी महाकाल मंदिरात ‘भस्म आरती’त भाग घेण्यासाठी गेले होते.

   

  गौतम अदानी-आंध्र प्रदेश
  अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी हे आंध्र प्रदेशातील श्रीकालाहस्ती मंदिरात जातात. हे शंकराचे प्रसिध्द मंदिर आहे.

   

  पुढे वाचा: सज्जन जिंदल कोणत्या मंदिरात जातात...

 • indian billionaire goes in tirupati sidhivinayak temple
  केदारनाथ येथे जेएसडब्ल्यूचे अध्यक्ष सज्जन जिंदल हे त्यांची पत्नी संगीता जिंदल सोबत.

  सज्जन जिंदल- केदारनाथ
  जेएसडब्ल्यूचे अध्यक्ष सज्जन जिंदल हे त्यांची पत्नी संगीता जिंदल सोबत 2015 मध्ये केदारनाथला गेले होते. 

   

  लक्ष्मी मित्तल- सिद्धी विनायक मंदिर
  आर्सेलर मित्तलचे चेअरमन लक्ष्मी मित्तल आणि त्यांची पत्नी उषा मित्तल सिध्दीविनायक मंदिरात पूजा करण्यासाठी जातात. 

  पुढे वाचा: बिर्ला कुटूंब कुठे जाते...

 • indian billionaire goes in tirupati sidhivinayak temple

  कुमार मंगलम बिर्ला कुटूंब- अमृतसर येथील दरबार साहेब

  कुमार मंगलम बिर्लाची पत्नी आणि त्यांचा मुलगा आरिमन विक्रम बिर्ला सोबत अमृतसर स्थित दरबार साहेब येथे गेले होते. त्यांनी तेथे केवळ पूजाच केली नाही तर सेवाही केली.

   

  पुढे वाचा: शिव नाडर कोणत्या मंदिरात जातात...

 • indian billionaire goes in tirupati sidhivinayak temple

  शिव नाडर- तिरूमला येथील व्यंकटेश्वर बालाजी मंदिर
  एचसीएलचे चेअरमन शिव नाडर हे तिरुमला येथील व्यंकटेश्वर बालाजी मंदिरात जातात. त्यांनी तेथे 5 कोटी रुपये दान स्वरुपात दिले आहेत. 

Trending