आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 पैशाच्या नफ्याने सुरु केला बिझनेस, उभा केला 200 कोटींचा व्यवसाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुभाष कपूर (मध्यभागी), मुलगा राजीव कपूर आणि नातू कशिश कपूर. - Divya Marathi
सुभाष कपूर (मध्यभागी), मुलगा राजीव कपूर आणि नातू कशिश कपूर.

नवी दिल्ली- लहान पिशव्या बनवून 25 पैशाचा नफा घेऊन एक व्यक्तीने 200 कोटींची कंपनी उभी केली हे अनेकांना अशक्य वाटते. पण स्टीलबर्ड हेल्मेटचे फाउंडर सुभाष कपूर यांनी हे दाखवून दिले आहे. 74 वर्षाचे सुभाष कपूर यांच्या स्ट्रगलची सुरूवात 1956 मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी बॅग बनविण्याचे   काम सुरु केले.

 

 

कुटूंबाच्या पालनपोषणासाठी शिवत होते बॅग
स्टीलबर्डचे अध्यक्ष सुभाष कपूर यांनीच या कंपनीचा पाया रचला. स्टीलबर्ड हाय टेक इंडिया एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे जी हेल्मेट बनवते. आता कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 200 कोटी होता. सूभाष कपूर यांनी एकेकाळी बॅग शिवण्यापासू ऑईल फिल्टर बनविण्याचे काम केले आहे. त्यांनी फायबर ग्लास प्रोटेक्शन गिअर बनविण्याचा बिझनेसही केला आहे. त्यांना शाळेत केवळ पास होण्यापूरते गुण मिळायचे. कुटूंब चालविण्यासाठी त्यांनी शाळाही सोडली. 

 

 

कपूर कुटूंब होते पाकिस्तानातील श्रीमंत कुटूंब
त्यांचे कुटूंब पाकिस्तानातील झेलम जिल्ह्यात राहत होते. त्यांचे कुटूंब फाळणीनंतर भारतात आले. पाकिस्तानात त्यांचे 26 व्यवसाय होते. यात यूटेंसिल्स, कपडे, दागिने आणि शेती याचा समावेश होता. त्यांच्या 13 विहिरी होत्या त्याने ते 30 एकर जमिनीचे सिंचन करत होते. त्यांच्या कुटूंबाने काश्मीरमध्ये पहिला पेट्रोल पंप उघडला होता. फाळणीमुळे हे कुटूंब कंगाल झाले होते.

 

 

फाळणीनंतर आले भारतात
कपूर कुटूंब 1947 साली फाळणीची घोषणा झाली त्यावेळी भारतात हरिद्वार येथे होते. त्यांची आई लिलावती, चार मुले छरज, जगदीश, कैलास आणि दीड वर्षाचा सुभाष यांच्यासोबत त्या ठिकाणी होती. त्यांच्याकडे पाकिस्तानात परत जाण्याचा पर्यायही नव्हता. त्यामुळे त्या भारतातच राहिल्या. त्यांचे वडील तिलकराज कपूर हे पाकिस्तानात होते. फाळणीनंतर भारतात येत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. ते बचावले पण त्यांच्याजवळ काहीच राहिले नाही. ते उपजीविकेसाठी छोटी-मोठी कामे करु लागले.

 

 

असा होता सुरुवातीचा काळ
त्यांचे कुटूंब हरिद्वारहून दिल्लीला 4 वर्षानंतर आले. त्यांच्या वडिलांनी व्यवसाय करायचा निर्णय घेतला. आपल्या पत्नीचे दागिने विकून त्यांनी व्यवसाय सुरु केला. ते मिठासाठी कापडी पिशव्या बनवू लागले. त्यांनी कपूर थाली हाऊस असे आपल्या कंपनीचे नाव ठेवले. ते 100 पाउच 4 रुपयात विकत होते. त्याचा हा लहान उद्योग चांगला चालत होता.

 

 

पुढे वाचा: कधी सुरु केली स्टीलबर्ड
 

बातम्या आणखी आहेत...