Home | Business | Industries | infog it sector skills enhancement to get jobs

IT sector Jobs : डाटा सायंटिस्टला असेल डिमांड, 2024 पर्यंत 12% नी वाढतील नोकऱ्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 23, 2018, 07:06 PM IST

जर तुम्हाला आयटी सेक्टरमध्ये करियर करायचे असेल तर तुम्ही डेटा सायन्स, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपर, सायबर सुरक

 • infog it sector skills enhancement to get jobs

  नवी दिल्ली- जर तुम्हाला आयटी सेक्टरमध्ये करियर करायचे असेल तर तुम्ही डेटा सायन्स, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपर, सायबर सुरक्षा, कोडिंग लॅन्ग्वेज सारखी कौशल्ये आत्मसात करायला हवीत. ही कौशल्ये आत्मसात केल्यास तुम्हाला आयटी सेक्टरमध्ये नोकरी मिळवणे सोपे होणार आहे. फोर्ब्सच्या सर्वेनुसार 2024 पर्यंत आयटी सेक्टरमध्ये नोकऱ्यांच्या संधी 12 टक्क्यांनी वाढणार आहेत. आयटी सेक्टरमध्ये या स्किल्सची गरज सर्वाधिक आहे.

  आर्टिफिशल इंटेलिजन्सचा अनुभव
  आर्टिफिशल इंटेलिजन्सची डिमांड इंडियन आणि इंटरनॅशनल आयटी सेक्टरमध्ये वाढत आहे. आयटी कंपन्यांचा फोकस आर्टिफिशल इंटलिजन्सवर अधिक आहे. आयटी क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी एआय आणि डेटा सायन्स स्किल्स तुम्हाला अधिक चांगल्या कराव्या लागतील.

  डेटा सायन्स टॅलेन्ट
  डेटा स्टोरेजमध्ये होणारी वाढ आणि मशीन लर्निंगमध्ये होणाऱ्या वाढीमुळे डेटा सायंटिस्टच्या मागणीत वाढ होत आहे. त्यांची डिमांड आयटी इंडस्ट्रीसोबतच हेल्थ, ड्रग डिस्कव्हरी, फायनान्स आणि बॅंकिंग सेक्टरमध्ये वेगाने वाढत आहे. कंपन्या मोठ्या प्रमाणावर अशा टॅलंटची भरती करत आहेत.

  मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हल्पमेंट
  मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपर्सची मागणी वेगाने वाढत आहे. त्यांची सर्वाधिक मागणी ट्रॅव्हल अॅप, शॉपिंग अॅप, ई-कॉमर्स सेक्टरमध्ये आहे. यशस्वी अॅप डेव्हलपर्सला मल्टीपल प्रोग्रामिंग लॅन्ग्वेजमध्ये कौशल्य प्राप्त असावे. जावा, एचटीएमएल 5, ऑब्जेक्टिव-C, C++, C#, पायथन सारखे प्रोग्रॅमिंग लॅन्ग्वेज येणे गरजेचे आहे. याशिवाय यूएक्स आणि यूआय डिझाईन स्किल्स आपल्या रिझ्युमध्ये व्हॅल्यू अॅड करेल.

  सायबर सिक्यूरिटी
  सायबर जगतात सातत्याने होणाऱ्या घुसखोरीमुळे आयटी जगतात सायबर सिक्युरिटीची गरज सातत्याने वाढत आहे. विविध संस्थांना आपला डेटा सुरक्षित करण्यासाठी काम करावे लागत आहे. स्टेकहोल्डर आणि कंपन्या सातत्याने सायबर सुरक्षेसाठी काम करत आहेत. त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. ही मागणी यावर्षी 2018 मध्ये सर्वाधिक वाढली आहे.

  आयटी सेक्टरमध्ये आणि क्लाउड वर्ल्डमध्ये वाढत आहे मागणी
  आयटी प्रोफेशनमध्ये क्लाउड कंप्यूटिंग स्किल्स आणि सॉफ्टवेअर एज अ सर्व्हिस (SaaS) माहिती असणाऱ्या प्रोफेशनलची डिमांड सातत्याने वाढत आहे. अमेझॉन AWS मध्ये वर्चुअलायजेशन, मायक्रोसॉफ्ट हायपर-व्ही आणि प्रायव्हेट क्लाउटमध्ये अशा प्रोफेशनल्सला मागणी आहे.

  कोडिंग आणि इंजिनिअरिंगचा अनुभव
  हायटेक इंडस्ट्रीत इंजिनिअरिंग माइंड आणि कोडिंग स्किल्स माहिती असणाऱ्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. यात नेहमी नवे प्रोडक्ट बनविण्यावर फोकस असतो.

Trending