आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानी यांचे जावई होणार आनंद पिरामल, रियल इस्टेट यूनिकॉर्न अशी आहे ओळख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आनंद पिरामल यांनी 2012 मध्ये पिरामल रिअॅल्टीची स्थापना केली. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
आनंद पिरामल यांनी 2012 मध्ये पिरामल रिअॅल्टीची स्थापना केली. (संग्रहित फोटो)

नवी दिल्ली- देशातील सगळ्या श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी यांचे लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे. मुकेश अंबानी यांनी पिरामल समुहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांची जावई म्हणून निवड केली आहे. रिलायन्स जिओच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, आनंद आणि ईशा हे दीर्घकाळापासून मित्र आहेत. दोन्ही कुटुंबामध्येही मागील 40 वर्षापासून चांगली संबंध आहेत. त्यांचे लग्न डिसेंबर महिन्यात होणार आहे. 

 

 

10 अब्ज डॉलरच्या पिरमल समुहाचे आहेत कार्यकारी संचालक
आनंद पिरामल हे 10 अब्ज डॉलरच्या पिरमल समुहाचे कार्यकारी संचालक आहेत. याशिवाय ते पिरामल इंडस्ट्रीजचे नॉन-एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आणि पिरामल रियाल्टीचे संस्थापक आहेत. आनंद पिरामल यांचे वडील अजय पिरामल, पिरामल समूहाचे अध्यक्ष आहेत. 7 मे 2018 रोजी फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे रियल टाईम नेटवर्थ 4.5 अब्ज डॉलर आहे.

 

 

सांभाळतात रियल इस्टेट व्यवसाय
आनंद पिरामल यांनी 2012 मध्ये पिरामल रियाल्टीची स्थापना केली. आनंद ग्रुप स्ट्रॅटजी, वॅल्यू आणि ऑर्गनायजेशन डेव्लपमेंटसाठी ते सक्रीय आहेत. त्यांनी मुंबई लगतच्या अनेक प्राईम लोकेशनच्या जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांनी एक उत्तम टीम बनवली आहे आणि वर्ल्ड क्लास डेव्लपमेंट डिझाईन केले आहे. कंपनीच्या विकासासाठी आनंद यांनी 2015 मध्ये 43.4 कोटी डॉलर गोल्‍डमॅन सॉक्‍स आणि वारबर्ग पिनकसमधुन जमवले आहेत. भारतातील ही सगळ्यात मोठी खासगी इक्विटी इन्‍वेस्‍टमेंट आहे.

 

 

पुढे वाचा: रियल इस्टेट यूनिकॉर्न....

बातम्या आणखी आहेत...